बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीससह बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला हजेरी लावली. मात्र, शाहरुख खानला यंदा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीला उपस्थित राहणे शक्य झाले नाही.
सलमान आणि शाहरुख हे दोघेही दरवर्षी बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीचे आमंत्रण स्विकारून आवर्जुन उपस्थित असतात. सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला अनेक बॉलीवूड तारकांची उपस्थिती असते. मात्र, यापेक्षा पार्टीत सलमान आणि शाहरुख यांची एकत्र भेट होणे याचीच चर्चा सर्वत्र असते. रविवारी रात्री बाबा सिद्दीकी यांनी यंदाच्या इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. शाहरुख यावेळी उपस्थित राहू शकला नसला तरी, सालाबादप्रमाणे यंदाही अनेक बॉलीवूड कलाकार पार्टीला उपस्थित होते. सलमानसह वडील सलीम खान, बहिण अर्पिता आणि तिचा पती आयुष शर्मा देखील उपस्थित होता. तर, अभिनेता वरुण धवन, हुमा कुरेशी, कबीर खान, संगीता बिजलानी आणि काही टेलिव्हिजन कलाकार यांनीही पार्टीला हजेरी लावली होती.
संग्रहित लेख, दिनांक 6th Jul 2015 रोजी प्रकाशित
बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीला सलमानची उपस्थिती पण शाहरुख अनुपस्थित
बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीससह बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला हजेरी लावली. मात्र, शाहरुख खानला यंदा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीला उपस्थित राहणे शक्य झाले नाही.

First published on: 06-07-2015 at 07:21 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan attends baba siddiquis iftar party srk couldnt make it this time