News Flash

सलमानने सहा दिवस आधी ठरलेलं लग्न मोडलं, साजिद नाडियाडवालाने केला खुलासा

काय म्हणला साजिद?

बॉलिवूडचा ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ सलमान खान लग्न कधी करणार? हा जणू राष्ट्रीय प्रश्नच झाला आहे. अनेक कार्यक्रमात त्याला त्याच्या लग्नाविषयी विचारलं जातं. अनेक अभिनेत्रींशी त्याचं नावंही जोडलं जातं. अलिकडेच ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सलमानच्या लग्नाबाबत पुन्हा एकदा चर्चा केली गेली. या चर्चेत प्रसिद्ध चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवाला याने सलमानच्या लग्नाबाबत धक्कादायक खुलासा केला.

सलमान आणि साजिद यांच्या मैत्रीचे किस्से बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चेत असतात. यावेळी साजिद हाऊसफुल ४ च्या प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आला होता. त्यावेळी त्याला ‘सलमान खानने लग्न का केले नाही?’ हा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्याने दोघांनी घेतलेल्या एका अनोख्या शपथेबाबत माहिती दिली.

काय म्हणला साजिद?

“१९९९ साली मी आणि सलमानने लग्न न करण्याची शपथ घेतली होती. परंतु नंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाची तारीखही ठरली होती. मात्र, लग्नाला पाच-सहा दिवस शिल्लक असताना सलमानने आपला निर्णय बदलला. पण मी मात्र, ठरलेल्या तारखेला लग्न केलं. माझ्या लग्नात सलमान स्टेजवर आला आणि मला पळून जाण्याचा सल्लाही त्याने दिला होता.” हा गमतीदार किस्सा साजिदने सांगितला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 12:28 pm

Web Title: salman khan cancelled wedding before due date sajid nadiadwala mppg 94
Next Stories
1 राज कुंद्रा अडचणीत, इक्बाल मिर्ची कनेक्शन प्रकरणी ईडीकडून समन्स
2 अशोक सराफ यांच्या ‘प्रियतम्मा’वर आली पेन्शनवर जगण्याची वेळ
3 बिग बॉसमधील ‘या’ स्पर्धकाने केला होता सनी लिओनीचा विनयभंग
Just Now!
X