28 September 2020

News Flash

…म्हणून दाक्षिणात्य अभिनेता सुदीपने मानले सलमानचे आभार

सुदीपने सलमानसोबतचा एक फोटो शेअर केला आहे

अभिनेता सलमान खान त्याच्या आगामी ‘दबंग ३’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचं सध्या मुंबईमध्ये चित्रीकरण सुरु असून सलमानचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य अभिनेता सुदीपदेखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सुदीपने नुकताच सलमानसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यासोबतच त्याने सलमानचे आभारही मानले आहेत.

संदीपने सलमानसोबतचा जीममधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघंही कूल अंदाजात पाहायला मिळत आहेत.  “प्रचंड उकाडा, उष्णतेमुळे शरीराची होणारी दाह, सारं काही सहन करण्यापलीकडेचं होतं. मात्र सेटवरील लोकांच्या उत्साहामुळे हा त्रास जाणवला नाही. उत्कृष्ट टीम, उत्तम लोक आणि कायम लक्षात राहिल असा आजचा दिवस. या दिवसाचा शेवट सलमान खान यांच्यासोबत जीममध्ये झाला. काम करत असताना साऱ्यांमध्ये मला सामावून घेतलं, आपल्या घरातलीच एक व्यक्ती समजलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार”, असं कॅप्शन सुदीपने या फोटोला दिलं आहे.

प्रभू देवा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. ‘दंबग ३’ हा प्रिक्वल असून यात चुलबूल पांडेची कौटुंबिक पार्श्वभूमी दाखवण्यात येईल अशी चर्चा आहे तर दुसरीकडे हा चित्रपट नोएडामधल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनातील सत्य घटनांवर आधारित असल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र सलमाननं याबद्दल बोलण्यास नकार दिला आहे. या चित्रपटाची कथा सध्या गुलदस्त्यातच राहू दे असं सलमाननं म्हटलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2019 12:51 pm

Web Title: salman khan dabangg 3 sudeep shared a picture from the first day on the sets of dabangg 3 with salman khan
Next Stories
1 Video : अन्यायाविरुद्ध तेजश्रीचा ‘एल्गार’
2 आमिरच्या बहिणीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, साकारणार ‘ही’ भूमिका
3 फॅनी वादळग्रस्तांना अमिताभ बच्चन यांचा मदतीचा हात
Just Now!
X