बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या ‘दबंग ३’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. पहिल्या तीन दिवसात जवळपास ५० कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या ‘दबंग ३’ ला प्रेक्षकांचा मिश्र प्रतिसाद मिळत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या चित्रपटाची चर्चा केवळ भारतातच नाही तर परदेशात देखील आहे. नुकतेच WWE या रेसलिंग शोने सलमानला एक ‘WWE सुपरस्टार बेल्ट’ देऊन त्याचे कौतुक केले. त्यांनी WWEचा बेल्ट घेऊन उभा असलेल्या सलमानचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करुन त्याला ‘दबंग ३’साठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मल्लिकाच्या ‘त्या’ मादक कृतीमुळे सलमानही लाजला

WWE हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय स्पोर्ट्स एन्टरटेन्मेंट शोंपैकी एक म्हणून ओळखला जातो. या शोमध्ये अनेक प्रकारच्या फाईटिंगच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धांमध्ये जिंकणाऱ्या खेळाडूला बक्षिस म्हणून एक पट्टा दिला जातो. ज्या खेळाडूंकडे असे पट्टे असतात. त्यांना WWE सुपरस्टार म्हणून ओळखले जाते. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे यावेळी WWEने सलमानचे कौतुक करण्यासाठी त्याला आपला मानाचा पट्टा दिला.

Video: उदित नारायण यांच्या मुलाने घातली नेहा कक्करला लग्नाची मागणी

WWEचा बेल्ट घातलेल्या सलमानचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. जगभरातील हजारो चाहत्यांनी भाईजानच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.

नुकताच प्रदर्शित झालेला ‘दबंग – ३’ हा दबंग मालिकेतला अनुक्रमे तिसरा चित्रपट आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या दोनही चित्रपटांनी बॉक्सऑफीसवर कोट्यवधी रुपयांची कमाई केली होती. तसेच या चित्रपटांमध्ये सोनाक्षी सिन्हा हिने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. ‘दबंग – ३’ मध्ये सोनाक्षीच मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे. या शिवाय मराठी अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर ही देखील या चित्रपटामध्ये आहे.