03 March 2021

News Flash

Video : माय-लेकाची सुपर जोडी! सलमानने आईसोबत धरला ‘या’ गाण्यावर ताल

पाहा, सलमानचा आईसोबत खास डान्स

बॉलिवूड अभिनेता सलमान खान कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरदेखील तितकाच सक्रीय आहे. अनेकदा तो त्याच्या कुटुंबीयांसोबतचे फोटो, व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. यात अनेक वेळा त्याचे काही व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होतात.यामध्येच सध्या सलमान आणि त्याच्या आईचा एक डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सलमानने त्याच्या आईसोबत एका इंग्लिश गाण्यावर ठेका धरल्याचं दिसून येत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ वूंपलाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हॉलिवूडमधील एका प्रसिद्ध गाण्यावर सलमान खान व त्याची आई सलमा डान्स करताना या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हा डान्स सलमा खान एन्जॉय करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

आणखी वाचा- माधुरी दीक्षितने शेअर केला पती आणि मुलांसोबतचा व्हिडीओ, म्हणाली..

दरम्यान, सलमान त्याच्या व्यस्त शेड्युलमधून कायमच कुटुंबासाठी वेळ काढत असतो. कधी भाच्यासोबत तर कधी आऊ-वडिलांसोबत तो वेळ घालवताना दिसून येतो. सध्या सलमान त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. सलमान लवकरच राधे, अंतिम या चित्रपटात झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2020 11:12 am

Web Title: salman khan dance with mom salma khan on cheap thrills song video viral on internet ssj 93
Next Stories
1 ‘माझा होशील ना’मध्ये सई-आदित्यची रोमॅण्टिक केमिस्ट्री
2 ‘…तर थोबाड फोडेन’; कश्मिराने दिली निक्कीला धमकी
3 अर्जुन रामपालला पुन्हा एकदा NCB कडून समन्स; आज होणार चौकशी
Just Now!
X