20 November 2019

News Flash

विवेकने शेअर केलेल्या ऐश्वर्याच्या त्या मीमवर सलमान म्हणाला..

शेअर केलेल्या मीमवरून होणारा वाद पाहता विवेकने ते ट्विट डिलीट कर माफी मागितली आहे.

सलमान खान, विवेक ओबेरॉय

एग्झिट पोल जाहीर झाल्यानंतर शेअर केलेल्या एका मीममुळे अभिनेता विवेक ओबेरॉय चांगलाच वादात सापडला आहे. एग्झिट पोल म्हणजे अंतिम निकाल नव्हे हे गमतीशीरपणे सांगणारा सलमान खान, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा मीम विवेकने पोस्ट केला होता. त्यावरून राजकीय नेत्यांसह बॉलिवूड कलाकारांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली तर राज्य व केंद्रीय महिला आयोगानं नोटीसही पाठवली आहे. यावर एका कार्यक्रमादरम्यान सलमान खानला प्रतिक्रिया विचारली असता त्याने त्याच्याच अंदाजात उत्तर दिलं.

सलमानने आपण ट्विटरवर फारसे सक्रीय नसल्याचे स्पष्ट करत म्हटले, ‘मी लक्षच देत नाही. आधीसारखं मी आता ट्विटरवर सक्रीय नसतो तर मीम्स कुठे बघत बसू. मी काम करू की कमेंट्स पाहू. मी अजिबात या गोष्टींकडे लक्ष देत नाही,’ असं उत्तर सलमानने दिलं.

शेअर केलेल्या मीमवरून होणारा वाद पाहता विवेकने ते ट्विट डिलीट कर माफी मागितली आहे.

काय आहे मीममध्ये?
एग्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर विवेकने एका मीमच्या माध्यमातून ऐश्वर्या रायचा भूतकाळ समोर आणला. या मीममध्ये तीन फोटो आहेत. पहिल्या फोटोत ऐश्वर्या राय सलमान खानसोबत असलेला फोटो आहे त्याखाली ओपिनियन पोल असे लिहिले आहे. दुसऱ्या फोटोत विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय असा फोटो आहे. त्या फोटोतएग्झिट पोल असे लिहिले आहे. त्यानंतर अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि अराध्या यांचा फोटो आहे त्याफोटोखाली रिझल्ट असं लिहिलं आहे. हे मीम विवेक ओबेरॉयने तयार केलेले नाही. मात्र ते शेअर करत हे मीम आपल्याला खरोखरच आवडले अशी प्रतिक्रिया दिली आहे. या मीमबरोबर विवेकने हे खूप क्रिएटिव्ह आहे. हे राजकारण नाही, फक्त आयुष्यच समजा, असं त्याने म्हटलं आहे.

First Published on May 21, 2019 6:54 pm

Web Title: salman khan gives epic response to vivek oberoi meme main dhyaan hi nai deta
Just Now!
X