News Flash

Video: दीपिकाचा ड्रेस पाहून सलमाननं दिलेली प्रतिक्रिया बघाच!

अतरंगी फॅशनसाठी तर रणवीर ओळखला जातो. पण यंदा दीपिकानेही प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला. 

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री दीपिका पदुकोण व तिचा पती रणवीर सिंगने यंदाचा ‘आयफा पुरस्कार’ गाजवला. या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यातील या जोडप्याचा पोशाख जोरदार चर्चेत होता. अतरंगी फॅशनसाठी तर रणवीर ओळखला जातो. पण यंदा दीपिकानेही प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला. सोशल मीडियावर सध्या त्यांच्याच कपड्यांची चर्चा आहे. अशातच सलमान खानचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. सोहळ्यातील दीपिकाचा ड्रेस पाहून त्याने दिलेली प्रतिक्रिया या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

दीपिकाने फिकट जांभळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. त्यावर त्याच रंगाची लांब ओढणी तिने डोक्यावरुन घेतली होती. पुरस्कार सोहळ्यादरम्यान ती पत्रकारांशी संवाद साधताना तिच्यामागून सलमान खान जात होता. जमिनीवरील तिच्या लांब ओढणीला पाहून ‘अरे हे काय आहे,’ अशीच सलमानची प्रतिक्रिया होती. या व्हिडीओतील त्याच्या चेहऱ्याचे भाव पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

याच सोहळ्यात रणवीरने राखाडी रंगाचा कोट व काळ्या रंगाचे गमबूट घातले होते. या कपड्यांवर त्याने लाल रंगाचा एक कपडा घेतला होता. त्याने परिधान केलेला हा पोशाख पाहून सलमानचे हसू आवरले नाही. त्याने रणविरची खिल्ली उडवत चक्क त्याच्या कपड्यांनी आपले तोंड पुसले. हा अचंबित करणारा प्रकार पाहून सभागृहातील सर्वच कलाकार जोरजोरात हसू लागले होते.

दीपिकाचा पोशाख पाहून अनेकांनी संगतीचा परिणाम झाल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिली. ‘लग्नानंतर दीपिकासुद्धा रणवीरच्या पावलांवर पाऊल ठेवत त्याच्यासारखेच अतरंगी कपडे घालू लागली आहे,’ अशी कमेंट एका युजरने केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 12:59 pm

Web Title: salman khan has priceless reaction to deepika padukone long train gown watch video ssv 92
Next Stories
1 बिग बींचं मराठी ट्विट; ‘या’ एका कारणामुळे अनेकांची स्वप्न राहतात अपूर्ण
2 सोनाक्षी सिन्हा ही ‘धन पशू’, युपीच्या मंत्र्याचं वक्तव्य
3 ‘मणिकर्णिका’नंतर अंकिताला मिळाला एक मोठा बॉलिवूड प्रोजेक्ट
Just Now!
X