बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानपेक्षा सलमान श्रेष्ठ असल्याचे विधान चित्रपट दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी केले आहे. गेल्याच महिन्यात रामगोपाल यांनी शाहरुखला स्टारपद गमावावे लागेल अशी भीती वाटत असल्याचे ट्वीट केले होते. यावेळी त्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉम’शी बोलताना सलमान हा शाहरुखपेक्षा नक्कीच मोठा स्टार असल्याचे विधान केले.
सलमान हा शाहरुखपेक्षा मोठा स्टार होतोय, असं वाटतं का? या प्रश्नाच्या उत्तरात रामगोपाल वर्मा म्हणाले की, सलमानने शाहरुखला केव्हाच मागे टाकलंय. सध्या सलमान नक्कीच शाहरुखपेक्षा मोठा स्टार आहे. बॉलीवूडमध्ये स्टारडम हे सध्या चित्रपट किती कमाई करतो यावर मोजले जाते. मग ज्या अभिनेत्याच्या गेल्या तीन चित्रपटांनी जास्त कमाई केली आहे. अर्थात तोच खरा सुपरस्टार आहे.
याआधी देखील रामगोपाल वर्मा यांनी शाहरुखच्या स्टारडमबाबत भीती व्यक्त केली होती. एकेकाळी ज्याप्रमाणे कमल हसन आणि रजनीकांत यांच्यातील स्पर्धेत कमल हसनला स्टारपद गमवावे लागले, तीच परिस्थिती शाहरूखवर ओढावण्याची शक्यता रामगोपाल वर्माने ट्विटरवरील संदेशांच्या मालिकेतून व्यक्त केली होती. रामगोपाल वर्माने शाहरूखच्या चित्रपट निवडीवर शंका उपस्थित करताना त्याने कमल हसनच्या चुकांमधून काहीतरी शिकले पाहिजे आणि सलमानसारखे राहिले पाहिजे, असा सल्ला दिला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 26, 2016 3:21 pm