16 January 2021

News Flash

शाहरुखच्या चित्रपटात सलमानची एण्ट्री; नव्या अ‍ॅक्शनपटात करणार स्क्रीन शेअर

शाहरुख आणि सलमान 'या' चित्रपटात येणार एकत्र

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान लवकरच आपला नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘पठाण’ असं या आगामी चित्रपटाचं नाव आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या चित्रपटात शाहरुखसोबत बॉलिवूडचा भाईजान सलमान खान देखील झळकणार आहे. परिणामी या दोन सुपरस्टार्सला मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

शाहरुखनं दोन वर्षांपूर्वी ‘झिरो’ या चित्रपटात काम केलं होतं. हा चित्रपट तिकिटबारीवर जोरदार आपटला होता. त्यानंतर दोन वर्षानंतर शाहरुखने एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘पठाण’ हा एक अॅक्शन थ्रीलर पठडीतील चित्रपट आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटात सलमान खान देखील झळकणार आहे. सलमान या चित्रपटात एक लहानसा कॅमियो सीन देणार आहे. सध्या या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरु आहे. सिद्धार्थ आनंद याने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्विकारली आहे. शाहरुखसोबत या चित्रपटात आणखी कोणते कलाकार झळकणार याबाबत कुठलीही माहिती अद्याप जाहिर केलेली नाही. येत्या काळात शाहरुख या चित्रपटाची अधिकृत घोषणा करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2020 6:10 pm

Web Title: salman khan join shah rukh khans upcoming thriller pathan mppg 94
Next Stories
1 गौरी खानने शेअर केला थ्रोबॅक फोटो ; म्हणाली…
2 ए.आर. रहमानच्या लेकीचं संगीत क्षेत्रात पदार्पण; खातिजाचं ‘हे’ गाणं ऐकलंत का?
3 अभिनवने दिलेल्या ‘त्या’ गिफ्टमुळे रुबिना राहणार बिग बॉसच्या घरात
Just Now!
X