23 January 2021

News Flash

फराज खानच्या मदतीसाठी सलमान आला धावून, भरले हॉस्पिटलचे बिल

जाणून घ्या सलमानने केलेल्या मदतीविषयी..

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सतत कोणाला ना कोणाला मदत करताना दिसतो. त्याचा हा दिलदार स्वभाव पाहून अनेकजण त्याच्याकडे मदतीसाठी विनंती करतात. सलमान देखील त्यांना मदत करताना दिसतो. नुकताच सलमानने ‘मेहंदी’ या चित्रपटातील अभिनेता फराज खानची मदत केली आहे. ही माहिती कश्मीरा शाहने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे.

कश्मीराने सलमानसोबत ‘दुल्हन हम ले जाएंगे’, ‘कहीं प्यार ना हो जाए’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने सलमानचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने दिलेल्या कॅप्शनमुळे सलमानने फराजची मदत केल्याचे समोर आले आहे.

‘तू खरच खूप महान आहेस. फराज खान आणि त्याचे मेडिकल बिल्स भरल्याबद्दल तुझे खूप आभार. “फरेब” अभिनेता फराज खानची सध्या प्रकृती खालावली आहे आणि सलमानने त्याला आधार दिला आहे. मी सलमानचे मनापासून आभार मानते. लोकांना ही पोस्ट आवडली नाही तर मला काही फरक पडणार नाही. तुमच्याकडे मला अनफॉलो करण्याचा पर्याय आहे. मी आता पर्यंत इंडस्ट्रीमध्ये भेटलेल्या लोकांपैकी सलमान एक चांगला व्यक्ती आहे’ असे कश्मीराने म्हटले आहे.

फराज सध्या बंगळुरुमधील एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. त्याला तीसऱ्या स्टेजचा मेंदूचा कर्करोग झाल्याचं निदान झालं आहे. उपचारासाठी त्याला आर्थिक मदत करावी अशी विनंती अभिनेत्री पूजा भट्टने देशवासीयांना केली होती. आता सलमानने त्याला २५ लाख रुपयांची मदत केली असल्याचे म्हटले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 12:35 pm

Web Title: salman khan paid bills of icu admitted actor faraaz khan avb 95
Next Stories
1 “बॉलिवूडमधील लांडगे एकत्र आले”; सलमान-आमिरवर कंगना रणौत संतापली
2 पतीच्या निधनानंतर पहिल्यांदाच व्हिडीओ शेअर करत मयूरी म्हणाली…
3 “लव्ह जिहाद बोलण्यापूर्वी स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट पाहा”; जिशान अय्युबच्या पत्नीचं ट्रोलर्सला प्रत्युत्तर
Just Now!
X