News Flash

‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’च्या टायटल ट्रॅकचे अनावरण!

हे गाणे सध्या चर्चेत आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘राधे-युवर मोस्ट वॉंटेड भाई’चा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चर्चेत होता. त्यानंतर चित्रपटातील दोन गाणी प्रदर्शित करण्यात आली होती. आता त्या पाठोपाठ चित्रपटातील टायटल ट्रॅकचे अनावरण करण्यात आले आहे.

जेव्हापासून दर्शकांनी ट्रेलरमध्ये टायटल ट्रॅक राधेचे टीजर ऐकले आहे, त्यांच्या उत्साहाला सीमा राहिलेली नाही. एक दिवस आधी, चित्रपटाच्या ज्यूक बॉक्ससोबत गाण्याचे ऑडियो प्रदर्शित करण्यात आले होते त्याला देखील शानदार प्रतिक्रिया मिळत आहेत. आता, सुपर एक्सायटेड फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे की चित्रपट निर्मात्यांनी ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’च्या टायटल ट्रॅकचे अनावरण केले आहे. साजिद-वाजिद द्वारा रचित आणि साजिदच्या आवाजात हा एक एंटरटेनर ट्रॅक आहे. व्हिडिओमध्ये सलमान खान आणि दिशा पटाणी डान्स करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सलमान खान डैपर लुकमध्ये दिसणार असून सलमान-दिशाची जोड़ी मुख्य आकर्षण आहे.

या आधी प्रदर्शित झालेली गाणी ‘सिटी मार’ आणि ‘दिल दे दिया’ प्रेक्षकांच्या मनावर जादू केली होती. आता टायटल ट्रॅकदेखील चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढवत आहे.

सलमान खानसोबत या चित्रपटात दिशा पटाणी, रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफ यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ची निर्मिती सलमान खान फिल्म्सने झी स्टूडियोसोबत मिळून केली आहे.या चित्रपटाची घोषणी २०१९मध्ये करण्यात आली होती. २०२०मध्ये ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता अखेर हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 4:44 pm

Web Title: salman khan radhe title song released avb 95
Next Stories
1 अभिनेता, दिग्दर्शक सुखजिंदर शेरा यांचे निधन
2 ‘हप्पू सिंह की उलटन पलटन’ मालिकेचे शूटिंग थांबले ; हे काम करतेय अभिनेत्री कामना पाठक
3 “आरक्षण नाही, भाषेला अभिजात दर्जा नाही, मायभूमीत…”; मराठी दिग्दर्शक संतापला
Just Now!
X