News Flash

बर्थ डे पार्टीत ‘ती’ सलमानसोबतच वावरत होती

एवढंच नाही तर त्याच्या कुटुंबियांचीही काळजी घेताना ती दिसून आली.

Salman Khan,सलमान खान, लुलिया वेंतुर, Iulia Vantur
सध्या सलमान आणि लुलिया यांच्यातील प्रेमसंबंधांच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानने आपला ५० वा वाढदिवस त्याच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर दणक्यात साजरा केला. सलमानच्या बर्थ डे पार्टीला अवघं बॉलीवूड अवतरलं होतं. पण साऱयांच लक्ष वेधून घेतलं ते रोमानियातील टेलिव्हिजन अभिनेत्री लुलिया वेंतुर हिने. सध्या सलमान आणि लुलिया यांच्यातील प्रेमसंबंधांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात सलामानच्या बर्थ पार्टीत लुलियाचा वावर अगदी सलमानच्या कुटुंबाचाच भाग असल्यासारखा होता. संपूर्ण पार्टीत लुलिया सलमानसोबतच होती. एवढंच नाही तर त्याच्या कुटुंबियांचीही काळजी घेताना ती दिसून आली. पार्टीत आलेल्या प्रत्येकाची विचारपूस देखील ती करत होती. त्यामुळे सलमान-लुलियाच्या प्रेमसंबंधांच्या चर्चांना आता आणखी जोर धरला आहे.
सलमान आणि लूलिया वेंतुरची वाढती जवळीक
याआधी सलमान-लुलिया यांचा साखरपुडा झाल्याचीही हवा बॉलीवूडमध्ये होती. दोघेही पुढील वर्षी लग्नबंधनात अडकणार असल्याचे वृत्त पिंक विला या इंग्रजी वेबपोर्टलने दिले होते.  सलमान आणि लुलिया बहुतेकवेळी एकत्र असतात. लुलिया सध्या वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत आहे. हे हॉटेल गॅलेक्सी अपार्टमेंटच्या जवळचं असून तिची सर्व बिले तोच भरतो. तिने अतुल अग्निहोत्रीच्या ओ तेरी चित्रपटात एक आयटम साँगदेखील केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2015 12:40 pm

Web Title: salman khan rings in his 50th birthday with rumoured girlfriend iulia vantur
टॅग : Salman Khan
Next Stories
1 माझा संकल्पः डायरीतील नमूद गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न
2 ‘KhanMarketOnline’ सलमानची चाहत्यांना भेट
3 आव्हान पेलताना..
Just Now!
X