News Flash

‘बिग बॉस’च्या निर्मात्यांकडून सलमानची फसवणूक

गेल्या आठवड्यात सलमानने स्पर्धकांसाठी घरचे जेवण पाठवले होते

अभिनेता सलमान खान

रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १०’ च्या घरात सुरु असलेल्या युद्धामुळे सध्या हा कार्यक्रम चांगलाच गाजत आहे. कधी स्पर्धकांचा उद्धटणा तर कधी सलमानला येणाऱ्या रागामुळे हा शो सध्या फारच गाजतो आहे. सध्या या कार्यक्रमाची वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चा आहे ती म्हणजे, या कार्यक्रमात सलमानची फसवणुक झाली आहे. असे बोलले जाते की, या फसवणुकीमुळे सलमान एवढा चिडला आहे की कदाचित तो पुढच्या पर्वामध्ये सुत्रसंचालनही करणार नाही.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रू मेंबर्सनी सलमानने सांगितलेल्या गोष्टींकडे कानाडोळा केला. गेल्या आठवड्यात सलमानने स्पर्धकांसाठी घरचे जेवण पाठवले होते. ‘विकेण्ड का वार’नंतर सलमानने कॅमेरा बंद झाल्यावर स्पर्धकांना त्याने पाठवलेले जेवण कसे होते याबद्दल विचारले. त्याचा हा प्रश्न ऐकून स्पर्धकांना आश्चर्यच वाटले.

स्पर्धकांनी सांगितले की, त्यांना जेवण मिळालेच नाही. या प्रकरणामुळे सलमानला फारच राग आला. त्याने नंतर शोच्या निर्मात्यांना विचारले की त्याने पाठवलेले जेवण स्पर्धकांपर्यंत का पोहोचले नाही? स्पर्धकांपर्यंत जेवण पोहोचले नाही यासाठी तर सलमान रागावला होताच पण त्याचा रागाचा पारा यामुळेही वाढला की स्पर्धकांना जेवण मिळाले नाही हेही त्याला कोणी सांगितले नाही. त्यामुळे सध्या तो निर्मात्यांच्या टीमवर प्रचंड नाराज असल्याचे दिसून येत आहे. टीमच्या अशा वागण्यामुळे कदाचित तो पुढच्या वर्षी या शोचे सुत्रसंचालनही करणार नाही असे वाटते.

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या उपांत्यफेरीत शाहरुख-सलमान यांचे पुन्हा एकदा एकत्र दर्शन होणार आहे. सोशल मीडियावर नुकतेच बिग बॉसच्या घरामधील सलमान-शाहरुखच्या मैत्रीचे रंग दाखविणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. बिग बॉसच्या घरातील शाहरुखसोबतच्या भेटीतील पहिली झलक सलमानने त्याच्या ट्विटर अकांऊटवरुन शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान शाहरुखच्या ‘रईस’ सिनेमातील लोकप्रिय संवाद बोलताना दिसत आहे. शाहरुखचा लोकप्रिय संवाद बोलताना सलमान मध्येच अडखळतो.

यावेळी शाहरुख व्यासपीठावर एन्ट्री करतो. लोकप्रिय संवाद तू कसा विसरलास असे तो सलमानला म्हणतो. यावर दिलदार भाईजान आपल्या मैत्रीचा दाखला देतो. शाहरुखचा संवाद त्याच्या तोंडूनच ऐकायलाच चांगला वाटतो असे सांगातना दिसते. यावेळी आपली मैत्री अतुट असल्याचे सांगत ‘सुलतान’ला फक्त मैत्रीच नात जपायला आवडते असे सलमान म्हणाताना दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 6:39 pm

Web Title: salman khan slams bigg boss 10 makers for disrespecting his request
Next Stories
1 ..या अभिनेत्याच्या चित्रपटासाठी परदेशात जाहीर केली एक दिवसाची सुट्टी
2 शौर्य- गुन्ह्याच्या मुळाशी जाण्याची पोलिसांची दुरदृष्टी
3 VIDEO: ऐश्वर्या रायने आपल्या चरित्रपटात काम करावे अशी होती जयललिता यांची इच्छा
Just Now!
X