20 September 2018

News Flash

आमिरच्या ‘महाभारत’ चित्रपटात सलमान साकारणार ‘ही’ भूमिका?

या चित्रपटामध्ये अनेक बड्या कलाकारांची वर्णी लागणार आहे.

सलमान खान, आमिर खान

आमिर खानचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट ‘महाभारत’ची गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा होत आहे. आमिरच्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत पौराणिक कथेवर आधारित या चित्रपटाची निर्मिती होणार आहे. या चित्रपटामध्ये अनेक बड्या कलाकारांची वर्णी लागणार असून हा चित्रपटदेखील ‘बाहुबली’प्रमाणेच यशस्वी कमाई करेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर सलमान खानसुद्धा आमिरच्या या ड्रीम प्रोजेक्टशी जोडला गेल्याची माहिती समोर येत आहे.

HOT DEALS
  • Sony Xperia XA1 Dual 32 GB (White)
    ₹ 17895 MRP ₹ 20990 -15%
    ₹1790 Cashback
  • Honor 7X 64 GB Blue
    ₹ 15445 MRP ₹ 16999 -9%

सलमानने आमिरच्या आगामी ‘महाभारत’ या बिग बजेट चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामध्ये सलमान कृष्णाची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर आमिर कर्ण किंवा अर्जुनच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. आमिर स्वत: कोणती भूमिका साकारावी याविषयी संभ्रमात आहे. त्याचबरोबर असंही कळतंय की अमिताभ बच्चन यांना त्याने धृतराष्ट्राची भूमिका साकारण्याची ऑफर दिली आहे. आमिरने द्रौपदीच्या भूमिकेसाठी अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या नावाला पसंती दर्शविली आहे. द्रौपदीची भूमिका दीपिका योग्यरित्या साकारु शकते असा विश्वास आमिरला आहे.

वाचा : कर्नाटकच्या राज्यपालांविषयीचं ट्विट उदय चोप्राला पडलं महागात

या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना ‘लार्जन दॅन लाइफ’ अनुभव देण्याचा आमिरचा प्रयत्न आहे. अर्थातच या चित्रपटाचा खर्चदेखील तितकाच जास्त असणार आहे. मुकेश अंबानी या चित्रपटाचा खर्च उचलणार असल्याचं म्हटलं जात आहे. सीरिजमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्याचे तीन ते चार भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतील. त्याचप्रमाणे प्रत्येक भागासाठी दिग्दर्शकसुद्धा वेगवेगळे असतील. ‘महाभारता’ची निर्मिती करणे हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे, असं आमिरनं याआधी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

First Published on May 16, 2018 2:43 pm

Web Title: salman khan to play lord krishna in aamir khan mahabharat says report