सपना चौधरी पाठोपाठ ‘बिग बॉस’च्या घरातून आणखी एका गोष्टीची गच्छंती झाली आहे. बिग बॉसच्या घरात असलेल्या बिपाशा बासू आणि तिचा नवरा करण सिंग ग्रोवर यांच्या कंडोम जाहिरातीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. मुख्य म्हणजे असे करण्यामागे ‘बिग बॉस ११’चा सूत्रसंचालक आणि ‘दबंग’ अभिनेता सलमान खानचा हात आहे. टीआरपीमध्ये आघाडीवर असलेला ‘बिग बॉस ११’ हा रिअॅलिटी शो अनेकजण आपल्या कुटुंबासह पाहतात. त्यामुळे शोमध्ये त्या जाहिरातीचे स्टॅण्डीज लावणे योग्य नसल्याचे सलमानचे मत आहे.

वाचा : मनोरंजन विश्वातील ठळक घडामोडी आणि गॉसिप

बिपाशा आणि करणची जाहिरात अगदीच बोल्ड आहे. त्यामुळे त्याचे स्टॅण्डीज शोमध्ये दाखवणे योग्य नसल्याचे सलमानला वाटते. सूत्रांच्या माहितीनुसार, कलर्सने देखील सलमानच्या या वक्तव्यावर कोणतीही चर्चा न करता जाहिरात काढण्याचा निर्णय घेतला.

वाचा : पहिल्या चित्रपटासाठी खिलाडी कुमारला किती मानधन मिळाले माहितीये?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘बिग बॉस’ ११ ची विजेता म्हणून जिच्याकडे पाहिले जात होते ती सपना चौधरी या शोमधून बाहेर पडली. शिल्पा शिंदे, हिना खान, सपना चौधरी आणि प्रियांक शर्मा हे चौघे या आठवड्यात नॉमिनेट झाले होते. हरियाणातील प्रसिद्ध डान्सर अशी सपना चौधरीची ओळख आहे. बिग बॉस शोमधून बाहेर पडल्यानंतर, मी फार आनंदी आहे. मी माझ्यासोबत अशा आठवणी घेऊन जातेय, ज्या आयुष्यभर माझ्यासोबत राहतील. या घरात राहिलेल्या साऱ्यांनाच मला पुन्हा भेटायला आवडेल. माझ्या मनात कोणाबद्दलही कटुता नाही. या घरात राहणारा प्रत्येकजण आपल्या जागी योग्य आहे, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना सपना म्हणाली.