News Flash

छोट्या अहिललाही लागले सलमान मामूप्रमाणे जीमचे वेड

जीममध्ये गेल्यावर त्याने अनेकांना आपले फॅन बनवले

सलमान खानचा भाचा, अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांचा मुलगा अहिलने जिमला जायला सुरुवात केली आहे. छोटा अहिलही आता जीममध्ये दिसू लागला आहे. पण तो इथे व्यायाम करायला किंवा सिक्स पॅक्स बनवायला येत नाही तर आपल्या आई अर्पितासोबत आला आहे. जीममध्ये गेल्यावर त्याने सेलिब्रिटी जीम ट्रेनर यास्मीन कराचीवालाला आपले फॅन बनवले आहे. या फोटोमध्ये यास्मीन अहिलला कुशीत घेऊन बसलेली दिसते. हा फोटो इन्स्ट्राग्रामवर शेअर करताना अर्पिताने लिहिले की, ‘परत जीमला जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि बघा मला साथ कोण देतय’. हाच फोटो यास्मीननेही शेअर केला. या फोटोवर ती म्हणाली की, ‘अर्पिता तू रोज येत जा’.

बॉलिवूडच्या दबंग खानचा हा गोंडस भाचा सोशल मीडियावर सतत चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी सलमानसोबतही त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हा फोटोही अर्पिताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला होता. या फोटोमध्ये सलमान खान, अर्पिताचा नवरा आयुष शर्मा आणि मुलगा अहिल दिसत आहेत. अर्पिताने या फोटोला सुंदर कॅप्शन दिले होते. ‘एकाच फ्रेममध्ये माझं पूर्ण आयुष्य दिसत आहे. माझा भाऊ, माझा नवरा आणि माझा मुलगा… माझी ताकद, माझा कमकुवतपणा, माझा आनंद… धन्यवाद.’ या फोटोमध्ये सलमान गळ्यात बूट अडकवून भाच्याशी खेळण्यात मग्न दिसत आहे. तर अहिल आपल्या बाबांच्या कुशीत आनंदी दिसतोय. बाबांकडे असतानाही त्याचं पूर्ण लक्ष आपल्या आवडत्या मामाकडेच आहे. त्याचे बोट पकडून तो सलमानशी खेळताना दिसत आहे. हे काही पहिल्यांदा नाही की अर्पिताने तिच्या मुलाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. याआधीही अहिलचे अनेक फोटो तिने आणि आयुषने याआधीही इन्स्ट्राग्रामवरुन शेअर केले आहेत.

सध्या सलमान त्याचा आगामी सिनेमा ‘ट्युबलाइट’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. सध्या या सिनेमाचे शूट मनालीमध्ये सुरु आहे. कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.

Trying to get back to the gym @yasminkarachiwala and look who’s giving us company

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 7:30 pm

Web Title: salman khans sister arpita khans son aahil spotted in gym
Next Stories
1 VIDEO: हेडफोन्स लावूनच ‘काबील’चा हा टीझर पाहा
2 अक्षय कुमार आता जिंकणार ऑलिम्पिक पदक
3 भाजप सरकारला मी गांभीर्याने घेत नाही- अभय देओल
Just Now!
X