नुकताच ‘केजीएफ चॅप्टर – २’  या बहुचर्चित चित्रपटातील अभिनेता संजय दत्तचा लूक प्रदर्शित झाला. हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. पण संजय दत्तचा चित्रपटातील अधीरा या पात्राचा लूक आणि ‘विकिंग्स’ या सीरिजमधील Ragnar Lothbrokच्या लूकशी मिळता जुळता असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर संजय दत्तचा हा लूक सध्या चर्चेत आहे.

Diet Sabya या इन्स्टाग्राम पेजने त्यांच्या स्टोरीमध्ये संजय दत्तचा चित्रपटातील अधीराचा लूक ‘विकिंग्स’ सीरिज मधील Ragnar Lothbrokच्या पोस्टरसोबत पोस्ट केला आहे. तसेच त्यांनी Ctrl C आणि Ctrl V असे म्हटले आहे. म्हणजे एकंदरीत ‘विकिंग्स’च्या पोस्टवरुन संजय दत्तचा अधीरा हा लूक कॉपी केल्याचे अप्रत्यक्षपणे म्हटले आहे.

तसेच संजय दत्तचा लूक प्रदर्शित होताच ट्विटरवर देखील चर्चा होती. अनेकांनी हा ‘विकिंग्स’ सीरिजमधील Ragnar Lothbrokची भूमिका साकारणारा अभिनेता Travis Fimmelचा लूक कॉपी केल्याचे म्हणत ट्विट करत म्हटले आहे.

‘विकिंग्स’ ही एक ऐतिहासिक सीरिज आहे. आता पर्यंत या सीरिजचे ६ सीझन प्रदर्शित झाले आहेत. २०१३मध्ये सीरिजचे पहिले सीझन प्रदर्शित झाले होते.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त ‘KGF 2’ चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. काही महिन्यांपूर्वी संजय दत्तने या आगामी चित्रपटाचा पोस्टर शेअर करुन याबाबत माहिती दिली होती. दुसरा भागाचा आवाका पहिल्या भागापेक्षाही अधिक मोठा असेल असे अभिनेता यशने सांगितले होते. हा चित्रपटही पहिल्या भागाप्रमाणेच हिंदी, तामिळ आणि कन्नड या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच या चित्रपटात अभिनेत्री रविना टंडन देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.