स्थालांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी ‘घर भेजो’ मोहीम हाती घेणारा अभिनेता सोनू सूद याचा जितके कॉल आणि मेसेजेस मदतीसाठी येत आहेत तितक्याच संख्येने त्याचे कौतुक करणारे मेसेज आणि ट्विटस केले जात आहेत. म्हणजे ट्विटवर अगदी सोनू सूद खरा हिरो पासून ते सोनू सूद सुपरहिरोपर्यंतचे हॅशटॅग दिसून येत आहेत. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत त्याने हजारो मुजरांना आपल्या राज्यामध्ये परत पाठवलं आहे. सोनूने केलेल्या मदतीची जाण ठेवत घरी सुखरुप पोहचलेल्या अनेक मजुरांनी त्याचे आभार मानले आहेत. अनेकजण त्याचे आभार मानण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करताना दिसत आहे. ट्विटवरुन काहीजण त्याचे आभार मानताना वाळू शिल्प बनवत असल्याचे सांगतात तर काहीजण चित्राच्या माध्यमातून सोनूला धन्यवाद देत आहेत. अगदी चित्रपटसृष्टीपासून ते क्रिकेट आणि राजकारण्यांपर्यंत अनेकांनी सोनूचे कौतुक केलं आहे. असं असतानाच एका दिग्दर्शकानेही अगदी आगळ्या वेगळ्यापद्धतीने सोनूच्या कामाचे कौतुक केलं आहे.
फोटो >> सोनूचा थक्क करणारा प्रवास: साडेपाच हजार रुपये घेऊन आला होता मुंबईत, आज ठरतोय अनेकांसाठी ‘देवदूत’
मागील काही दिवसांपासून सोनूसंदर्भात अनेक मिम्स व्हायरल झाले आहेत. अर्थात सकारात्मक पद्धतीच्या या मिम्समध्ये सोनूच्या कामाचे कौतुक करण्यात आलं आहे. असंच एक व्हायरल झालेलं मिम हो अभिनेता अक्षय कुमारशी संबंधित आहे. देशामध्ये एखाद्या व्यक्तीने एखादी चांगली गोष्ट केली किंवा पुरस्कार मिळवल्यानंतर नेटकऱ्यांना नेहमी अक्षय कुमारची आठवण येते. यशस्वी सत्य कथांवर आधारित चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका करण्याचा अक्षयचा कल पाहता नेटकरी एखाद्या चांगल्या गोष्टीनंतर यावर आधारित चित्रपट आला तर अक्षय त्यात मुख्य भूमिका करेल असं मजेने म्हणतात. असंच काहीसं आता झालं आहे. सोनू करत असलेली मदत पाहून त्याच्या या कामाची दखल घेणार चित्रपट तयार केलाच तर अक्षय कुमारच त्यामध्ये सोनूची भूमिका साकारेल असा एक मेसेज सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. याच मेजेसच्या आधारे दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी सोनूचं कौतुक केलं.
नक्की वाचा >> दिवसाला ५६ हजार मेसेजेस, १८ तास काम; सोनूच्या कामाचा आवाका पाहून थक्क व्हाल अन् तरी तो म्हणतो…
संजय गुप्ता यांनी सोनूला हा मेसेज पाठवला. आणि त्यानंतर यावर आलेला सोनूचा रिप्लाय काय होता त्यासंदर्भातील स्क्रीनशॉर्ट संजय गुप्ता यांनी शेअर केला आहे. “भावा, पुढच्या चित्रपटामध्ये अक्षय कुमार सोनू सूदची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटासंदर्भातील अधिकार मला मिळू शकतील का?”, असा मजेदार मेसेज गुप्ता यांनी सोनूला व्हॉट्सअॅपवर केला. यावर सोनूने थेट कोणताही प्रतिक्रिया दिली नसली तरी हसणारे आणि लाजणारे इमोन्जी पाठवून गुप्ता यांच्या मेसेजला रिप्लाय केला आहे.
Me n Sonu. pic.twitter.com/eKmQaKl6h3
— Sanjay Gupta (@_SanjayGupta) May 25, 2020
नक्की वाचा >> “खबरदार, भारतात शिरण्याचा प्रयत्न केला तर…”; सोनु सूदच्या नावाने थेट चीनला इशारा
गुप्ता यांच्या या ट्विटवर अक्षयच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त करत अक्षयनेही करोनाग्रस्तांसाठी पीएम केअर्सला २५ कोटींची मदत केल्याची आठवण करुन दिली. तर काहींनी ज्याप्रकारे अक्षयने एअरलिफ्ट या चित्रपटामध्ये परदेशातील भारतीयांना वाचवल्याचे दाखवले आहे त्याप्रकारे सोनूच्या कामावर चित्रपट आलाच तर त्याचे नाव ‘रोडलिफ्ट’ ठेवावे असा सल्ला दिली आहे. अनेकांनी सोनूनेच ही भूमिका साकारावी असंही मत नोंदवलं आहे.