02 March 2021

News Flash

ठरलं तर! सारा आणि वरुण धनवचा ‘कूली नं. १’ या दिवशी होणार प्रदर्शित

अॅमोझॉन प्राईमवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे

नव्वदच्या दशकात गोविंदाच्या ‘कुली नंबर १’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाची लोकप्रियता पाहाता चित्रपट दिग्दर्शक डेव्हिड धवनने त्याचा रिमेक करण्यात निर्णय घेतला होता. या रिमेकमध्ये अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत. आता या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.

नुकताच वरुण धवनने ट्विट करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषीत केली आहे. ‘कुली नं. १ हा चित्रपट येत्या ख्रिसमसला अॅमोझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे’ असे त्याने म्हटले आहे.

यापूर्वी हा चित्रपट १ मे २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता हा चित्रपट २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

हा चित्रपट १९९५ साली प्रदर्शित झालेल्या ‘कुली नंबर १’ या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात अभिनेता गोविंदा आणि आभिनेत्री करिश्मा कपूर यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. नव्या चित्रपटात वरुणसोबत अभिनेत्री सारा अली खान देखील झळकणार आहे. सारा आणि वरुणला एकत्र चित्रपटात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2020 12:05 pm

Web Title: sara ali khan and varun dhavan movie coolie no 1 release date avb 95
Next Stories
1 Confirm : नेहा कक्कर करणार ‘या’ गायकाशी लग्न
2 आणखी एका अभिनेत्रीनं इस्लामसाठी बॉलिवूडला केला रामराम
3 ..म्हणून लतादीदींनी केलं सुबोध भावेचं कौतुक
Just Now!
X