News Flash

रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’मधून सारा अली खान आऊट; ‘ही’ अभिनेत्री साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

साराऐवजी 'या' अभिनेत्रीला करण्यात आलं रिप्लेस

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सुरु असताना बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आलं. या प्रकरणी कलाविश्वातील अनेक दिग्गजांची नावं उघड झाली आहेत. अनेकांची एनसीबीने चौकशीदेखील केली आहे. यात अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह या सारख्या काही आघाडीच्या अभिनेत्रींचीदेखील चौकशी करण्यात आली. विशेष म्हणजे ड्रग्स प्रकरणी नाव आल्यानंतर अभिनेत्री सारा अली खानच्या हातून अनेक मोठ-मोठे चित्रपट गेल्याचं पाहायला मिळत आहे. ‘हिरोपंती 2’ नंतर आणखी एक चित्रपट साराला गमवावा लागला आहे.

‘फिल्मफेअर’नुसार, काही दिवसांपूर्वी साराच्या हातून ‘हिरोपंती 2’ हा चित्रपट गेला. त्यानंतर आता ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटातूनदेखील साराला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अ‍ॅनिमल या चित्रपटासाठी आधी साराच्या नावाची चर्चा होती. मात्र, आता तिच्या जागी अभिनेत्री तृप्ती डिमरी हिला रिप्लेस करण्यात आलं आहे.

आणखी वाचा- ‘शेवटी विजय त्याचाच होतो, जो…’; करण जोहरची ‘ही’ पोस्ट होते व्हायरल

२०२१ या नव्या वर्षाच्या सुरुवातीला संदीप रेड्डी वांगा यांनी त्यांच्या आगामी ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाची घोषणा तेली. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर, अनिल कपूर आणि परिणीती चोप्रा हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. विशेष म्हणजे या कलाकारांसोबत सारा अली खानदेखील झळकणार होती. मात्र, आता तिच्या जागी तृप्ती डिमरी झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2021 8:42 am

Web Title: sara ali khan replace animal movie trupti dimari drug case ssj 93
Next Stories
1 राज कपूर, दिलीप कुमार यांच्या घरांचे पाकिस्तानात जतन
2 IFFI साठी ‘छिछोरे’ची निवड; सुशांतच्या अनुपस्थितीमुळे श्रद्धा झाली भावूक
3 उर्मिला मातोंडकर यांनी ३ कोटी ७५ लाख रुपयांचं खरेदी केलं ऑफिस
Just Now!
X