न्याय्य निर्णय होऊ शकणार नाही, असा विश्वास वाटत असल्याने दिग्दर्शक सनल कुमार शशिधरन यांनी त्यांचा सेक्सी दुर्गा हा चित्रपट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खुले पत्र लिहिले आहे.
सनल यांचा सेक्सी दुर्गा हा चित्रपट गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. सेक्सी दुर्गा हा चित्रपट खरे तर चित्रपट पुरस्कारात चांगला स्पर्धक ठरला असता पण अतिशय खेदाने हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार स्पर्धेसाठी न पाठवण्याचा निर्णय घेत आहे, असे सनल कुमार शशिधरन यांनी म्हटले आहे. या निर्णयाप्रत येण्याची कारणे तुम्हाला माहिती असतील, तुम्ही हे पत्र वाचाल की नाही हेही माहिती नाही. पण लोकशाही व विविधतेच्या अस्तित्वावर प्रेम करणारा एक नागरिक म्हणून हे सगळे जाहीर करीत आहे. एस दुर्गा चित्रपटाबाबत न्याय केला जाईल असे वाटत नाही, असे व्यक्तिगत अनुभवावरून वाटते आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केले. एस. दुर्गा या चित्रपटाला रॉटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात टायगर पुरस्कार मिळाला होता. जीनिव्हा, मेक्सिको, आर्मेनिया या तीन ठिकाणीही चित्रपट पुरस्कार मिळाले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 8, 2018 2:55 am