25 September 2020

News Flash

सलमान बिग की शाहरूख बॉस?

‘बिग बॉस’ सुरू झाले की त्याच्या माध्यमातून सिनेमाची प्रसिद्धी करण्याचा आतापर्यंतचा ट्रेण्ड आहे. याहीवेळी तो सुरूच राहील का, याबाबत मात्र शंका आहे.

| September 20, 2014 02:40 am

‘बिग बॉस’ सुरू झाले की त्याच्या माध्यमातून सिनेमाची प्रसिद्धी करण्याचा आतापर्यंतचा ट्रेण्ड आहे. याहीवेळी तो सुरूच राहील का, याबाबत मात्र शंका आहे. कारण बॉलिवुडमधील दोन ‘सुपर खान’ परस्परांसमोर उभे ठाकणार आहेत. एक म्हणजे ‘बिग बॉस’चा सूत्रधार सलमान आणि हॅपी न्यू इयरच्या प्रसिद्धीसाठी झटणारा शाहरूख. हे दोन्ही खान परस्परांना पाण्यात पाहतात हे अवघ्या सिनेसृष्टीला माहीत आहे. कधी त्यांच्यात दिलजमाई होते तर अनबन, त्यामुळे सलमान शाहरूखला ‘बिग बॉस’च्या माध्यमातून ‘हॅपी न्यू इयर’ची प्रसिद्धी करण्यासाठी आमंत्रित करेल काय हा प्रश्न होता. शाहरूख ‘बिग बॉस’च्या माध्यमातून ‘हॅपी न्यू इयर’ची प्रसिद्धी करण्यास तयार असेल तर आपली काहीच हरकत नसल्याचे सलमानने सांगून टाकले आहे.
 ‘बिग बॉस’चे प्रसिध्दी कार्यक्रम सुरू झाल्यानंतर सलमानला शाहरूखच्या चित्रपटाची प्रसिद्धी करणार की नाही, असा थेट प्रश्न विचारला गेला. सलमाननेही शाहरूख शोमध्ये ‘हॅपी न्यू इयर’ची प्रसिद्धी करायला तयार असेल तर मला काहीच हरकत नाही. त्यांचे प्रसिद्धी कार्यक्रमही सुरू झाले आहेत त्यामुळे शोमध्ये यायचे की नाही हा आता त्यांचा निर्णय आहे, असे जाहीर करत प्रश्न शाहरूखकडे टोलवला. शाहरूखलाही सलमानच्या या खुल्या आमंत्रणाविषयी प्रश्न करण्यात आला. तेव्हा सलमानने घेतलेल्या या भूमिकेमुळे आपल्याला आनंद झाल्याची कबुली शाहरूखने दिली. सलमानने स्वत:हून शोमध्ये चित्रपटाची प्रसिद्धी करण्याविषयी विचारणा केली हा त्याचा चांगुलपणा आहे, असा शेराही त्याने दिला. मात्र, आमच्या प्रसिध्दी कार्यक्रमांचे नियोजन झाले आहे. त्यात जर ‘बिग बॉस’मध्ये आम्हाला प्रसिद्धी करणे शक्य झाले तर नक्की करू पण आम्ही तशाप्रकारे शोमध्ये जाऊन प्रसिद्धी करू शकलो नाही. तर उगाच त्याची चर्चा होऊ नये, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली. या दोन्ही खानांची आपापल्या क्षेत्रातली मातब्बरी आणि निर्मात्यापासून-दिग्दशर्कापर्यंत सर्वावर असणारी पकड पाहता त्या दोघांनीही एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र, आपल्या दोघांचेही जमणार नाही हे मनात पक्के माहित असल्याने दोघेही आपापला स्वतंत्र बाणा जपत एकत्र येऊ शकतोचा बहाणा करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2014 2:40 am

Web Title: shah rukh can promote happy new year on salman khan bigg boss
Next Stories
1 ‘नटी’साठी जुळून आला ‘स्वराशा’ योग
2 पाहाः रेखा यांच्या ग्ल्रॅमरस रुपातील ‘सुपर नानी’चा ट्रेलर
3 ‘मामि’ महोत्सवात : अभिनेत्री हेलन यांना ‘जीवनगौरव’
Just Now!
X