News Flash

‘बादशहा’ कारनं नाही तर हेलिकॉप्टरनं सेटवर जातो

शाहारुखचा फोटो व्हायरल

हिरो या सिनेमाचं चित्रिकरण वसईमध्ये सुरू आहे.

बॉलिवूडचा ‘बादशहा’ शाहारुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. शाहारुखचा ‘झिरो’ हा सिनेमा वर्षाअखेर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं चित्रिकरण वसईमध्ये सुरू आहे. शाहारूख रोज संध्याकाळी चित्रिकरणासाठी निघतो. पण, मुंबईच्या वाहतूक कोंडीमुळे शाहारुखचा बराच वेळ वाया जातो. त्यामुळे या समस्येवर उपाय म्हणून बादशहा हेलिकॉप्टरनं सेटवर जातो.

डेक्कन क्रोनिकलच्या बातमीनुसार शाहारूख झिरोच्या सेटवर अनेकदा हेलिकॉप्टरनंच जातो. सायंकाळी सात ते सकाळी सहा असा चित्रिकरणाचा वेळ आहे. यावेळेत वाहतूक कोंडीत हमखास अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे सेटवर पोहोचण्यासाठीही उशीर होतो म्हणूनच शाहारूखनं हा नवा मार्ग निवडला आहे. सध्या वसईमध्ये या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग चित्रीत होत आहे. त्यामुळे शाहारुख चित्रिकरण करुन सकाळी परततो. डिसेंबर २०१८ मध्ये ‘झिरो’ प्रदर्शित होत आहे. शाहारुखसोबत कतरिना कैफ या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहे.

IPLच्या उद्घाटन सोहळ्यात ‘या’ व्यक्तीच्या इशाऱ्यावर नाचणार हृतिक

शेवटची दोन वर्षंच राहिली आयुष्याची- केआरकेचा धक्कादायक खुलासा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 4:51 pm

Web Title: shah rukh khan taking chopper rides to reach on set
Next Stories
1 ‘बागी २’ सिनेमाबद्दलच्या या ५ अनोख्या गोष्टी माहिती आहेत का?
2 ..म्हणून चाहते माधुरीच्या नृत्याला मुकणार
3 अनिल कपूरचा मुलगा ‘या’ स्टारकिडला करतोय डेट?
Just Now!
X