सुपरस्टार शाहरुख खानने हॉलिवूड निर्माता दिग्दर्शन ब्रेट रॅटनरला त्याची फेमस लुंगी डान्स ही सिग्नेच स्टेप शिकवली. ब्रेटने, किंग खानला घेऊन ‘रश अवर’ या सिनेमाचा सिक्वल बनवण्याची इच्छाही यावेळी बोलून दाखवली. हे दोघंही सेंट फ्रांसिस्को येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी एकत्र भेटले होते. यावेळी रॅटनरला एक दिवस शाहरुखला घेऊन भारतात ‘रश अवर’ या सिनेमाचा सिक्वल बनवायचा असल्याची इच्छाही बोलून दाखवली. ब्रॅटने ‘एक्स मॅनः द लास्ट स्टॅण्ड’ आणि ‘रश अवर’ या सिनेमांच्या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. तसेच त्याने ऑस्कर विजेता सिनेमा ‘द रेवनंट’ या सिनेमाची निर्मितीही केली आहे.

शाहरुख आणि ब्रॅटने कॅस्ट्रो थिएटरमध्ये त्यांच्या मुलाखती दरम्यान खूप मजा मस्ती केली. रॅटनरने बादशाहसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत, ‘बॉलिवूडच्या किंग खानसोबत एसएफफिल्म फेस्टिवलमध्ये गप्पा मारायला सज्ज झालो आहे,’ असे कॅप्शनही दिले. या फोटोनंतर थोड्याच वेळात त्याने एक व्हिडिओही शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये शाहरुख त्याला लुंगी डान्सच्या काही स्टेप्स शिकवताना दिसला. लुंगी डान्सचे गाणे तिथे उपलब्ध नव्हते, म्हणून शाहरुखने स्वतः ते गाणे गायले आणि रॅटनरला डान्सच्या स्टेप्सही शिकवल्या. हा व्हिडिओ शेअर करताना, शाहरुखचे कौतुक केले. तर दुसरीकडे शाहरुखही रॅटनरचे आभार मानायला विसरला नाही.

कार्यक्रमात यशासोबतच स्वप्नांबद्दल बोलताना शाहरुख म्हणाला की, ‘यशासोबत आपल्या स्वप्नांना जिवंत ठेवण्याचा एकच मार्ग म्हणजे, लहान गोष्टीत आनंद शोधणे. जर तुम्ही मोठ्या गोष्टींमध्ये आनंद शोधत राहाल तर फक्त आपलं यश सांभाळत बसाल.’ पण मग छोट्या गोष्टी म्हणजे तरी काय याचं उदाहरण देत, तो अब्रामसोबत प्लॅस्टीकच्या खेळण्यांनी घर बनवतो. यात तो आनंद मिळवतो असं त्याने सांगितले.

https://www.instagram.com/p/BS5yyHhj9Fl/