News Flash

शाहरुख खानवर आली काम मागण्याची वेळ?

'झिरो' अपयशी ठरल्यानंतर तो कोणत्याही चित्रपटात झळकलेला नाही

शाहरुख खान

‘किंग ऑफ रोमान्स’, ‘बादशाह’, ‘किंग ऑफ बॉलिवूड’, ‘किंग खान’ अशा विविध नावांनी ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खानला आता कलाविश्वामध्ये जवळपास २५ वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहेत. या काळामध्ये त्याने एकापेक्षा एक दमदार चित्रपटांमध्ये भूमिका साकारली. पण सध्या किंग खानची जादू ओसरताना दिसत आहे. काही दिवसापूर्वी तो ‘झिरो’ या चित्रपटामध्ये झळकला होता. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला. तेव्हापासून शाहरुख आतापर्यंत कोणत्याही चित्रपटामध्ये काम केलेलं नाही. किंबहुना आता त्याच्याकडे चित्रपटांच्या ऑफर्स येत नसल्याचा समज चाहत्यांनी केला आहे. त्यातच सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख फोनवर कोणाकडे तरी काम मागताना दिसत आहे.

‘झिरो’ अपयशी ठरल्यानंतर शाहरुखने कोणत्याही चित्रपटामध्ये काम केलेलं नाही. त्यामुळे त्याचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र आता शाहरुखने त्याचा मोर्चा वेब सीरिजकडे वळविला आहे. शाहरुखची आगामी ‘बार्ड ऑफ ब्लड’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या सीरिजचा एक प्रमोशन व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख फोनवर बोलत असून तो कोणाकडे तरी काम मागताना दिसत आहे.


दरम्यान, या सीरिजची निर्मिती शाहरुख खान करत असून याचं दिग्दर्शन रिभू दासगुप्ता करणार आहे. या सीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. विशेष म्हणजे प्रदर्शित झालेल्या व्हिडीओवरुन शाहरुख या सीरिजमध्ये काम करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र शाहरुख खरंच या सीरिजमध्ये अभिनय करणार की केवळ निर्माता म्हणूनच काम पाहणार हे सीरिज प्रदर्शित झाल्यानंतरच स्पष्ट होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2019 1:05 pm

Web Title: shah rukh khan teases puzzling video with netflix ssj 93
Next Stories
1 ‘द रॉक’च्या दुसऱ्या लग्नात बायकोने घातला लाखोंचा गाऊन, जाणून घ्या किंमत
2 ‘नेटफ्लिक्स’साठी प्रियांका चोप्रा होणार सुपरहिरो
3 …म्हणून दीपिकाने घेतला अभिनेत्री होण्याचा निर्णय
Just Now!
X