फोर्ब्सने यंदाची टॉप १०० सेलिब्रेटींची यादी जाहीर केली असून, यात बॉलीवूड बादशाहा शाहरुख खान हा अव्वल स्थानी आहे. त्याने वर्षभरात २५७.५० कोटी इतकी कमाई केली असून, दुस-या स्थानावर सलमानची वर्णी लागलीय. तर तिस-या स्थानी अमिताभ बच्चन आहेत.
गेल्यावर्षी याच यादीत शाहरुख तिस-या स्थानी होता. फोर्ब्स यादी ही सेलिब्रेटींचे वर्षभरातील उत्पन्न आणि त्यांची प्रसिद्धी यावरून तयार करण्यात येते. यात २५७.५० कोटींची कमाई करत शाहरुख अव्वल स्थानी आहे. तर सलमान खान (२०२.७५ कोटी) आणि अमिताभ (११२ कोटी) यांनी अनुक्रमे दुसरे, तिसरे स्थान पटकाविले आहे. त्यानंतर भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी (११९.३३ कोटी), तर १०४.२५ कोटींची कमाई आणि प्रसिद्धीच्या जोरावर आमिरने पाचवा नंबर लावला आहे. याव्यतिरीक्त ए. आर. रेहमान (१४ वा क्रमांक), अजिंक्‍य रहाणे (२५ वा क्रमांक), कपिल शर्मा (२७ वा क्रमांक), सायना नेहवाल (३९ वा क्रमांक), चेतन भगत (६६ वा क्रमांक), रजनीकांत (६९ वा क्रमांक), अजय-अतुल (८२ वा क्रमांक) यांचाही या फोर्ब्स यादीत समावेश आहे.
फोर्ब्स यादीतील पहिले दहा नामवंत (कमाई कोटींमध्ये)
शाहरुख खान : २५७.५०
सलमान खान : २०२.७५
अमिताभ बच्चन : ११२
महेंद्रसिंह धोनी : ११९.३३
आमीर खान : १०४.२५
अक्षयकुमार : १२७.८३
विराट कोहली : १०४.७८
सचिन तेंडुलकर : ४०
दीपिका पदुकोण : ५९
हृतिक रोशन : ७४.५०