बॉलीवूड अभिनेता अजय देवगणच्या ‘सिंघम रिटर्न्स’चा फर्स्ट लूक प्रदर्शित झाल्यानंतर बॉलीवूड ‘किंग खान’ शाहरूखने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अजयला चित्रपट सुपरहिट व्हावा यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
विशेष म्हणजे, २०१२ साली शाहरुखचा ‘जब तक है जान’ आणि अजयचा ‘सन ऑफ सरदार’ एकाच दिवशी प्रदर्शित झाल्याने दोन्ही अभिनेत्यांमध्ये वितुष्ट निर्माण झाल्याची चर्चा बॉलीवूडमध्ये होती. त्यानंतर खुद्द शाहरुखने आता अजयचा चित्रपट हिट व्हावा यासाठी दिलेल्या शुभेच्छांवरून आता सर्वकाही आलबेल असल्याची चिन्हे आहेत.
‘सिंघम रिटर्नस्’ चा प्रोमो ११ जुलैला प्रदर्शित
शाहरुखने सिंघम रिटर्न्सच्या यशासाठी अभिनेता अजय देवगणसोबत चित्रपटाचा निर्माता रोहीत शेट्टीलाही शुभेच्छा दिल्या आहेत.

 

याआधी अजय देवगणच्या ‘सिंघम’ने बॉक्सऑफीसवर चांगलीच कमाई केली होती. या पार्श्वभूमीवर आणि रोहीत शेट्टीचे दिग्दर्शन असल्यामुळे ‘सिंघम रिटर्न्स’मध्ये अजय देवगणची आधीच्या सिंघमपेक्षाही अधिकपटीने अॅक्शनपॅक कामगिरी पहायला मिळेल. चित्रपटात अजयसोबत अभिनेत्री करिना कपूर मुख्यभूमिकेत दिसणार आहे. सिंघम रिटर्न्स १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अजयची ‘व्हॅनिटी व्हॅन’ ‘जिम’मध्ये रुपांतरीत होते तेव्हा..