News Flash

चिमुरड्या मिशासह पहिल्यांदाच शाहिद आणि मीरा गेले सुट्टीवर

सध्या शाहिद त्याच्या मुलीसोबतच जास्त वेळ घालवत आहे.

शाहिद कपूर

सोशल मीडियापासून बराच काळ अभिनेता शाहिद कपूर दूर राहिला होता. पण गेल्या काही काळापासून तो इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर सक्रिय आहे. ज्या ट्विटर अकाऊंटवरुन शाहिदने त्याला मुलगी झाल्याची माहिती दिली होती, त्यावरच शाहिदने आतापर्यंत त्याच्या लहान मुलीचे म्हणजेच मिशाचे फोटो पोस्ट केले नव्हते. पण, शाहिदने त्याच्या मुलीची पहिली झलक देण्यापासून प्रसारमाध्यमांना जितके लांब ठेवले होते, तितकेच माध्यमांनीही शाहिदचा पिच्छा काही सोडला नाही. सरतेशेवटी प्रसारमाध्यामांच्या वाट्याला यश आले आणि शाहिद कपूरच्या लहानग्या मिशाची पहिलीवहिली झलक मिळालीच.

मुंबईच्या एका विमानतळावर शाहिदला त्याच्या मुलीला घेऊन जाताना पाहायला मिळाले. एका गुलाबी रंगाच्या कापडामध्ये शाहिदने मिशाला गुंडाळून तिला उचलून घेतले होते. शाहिद आणि मिशासोबत शाहिदची ‘बेबी वाईफ’ म्हणजेच मीरा राजपूत कपूरही होती. मिशाच्या जन्मानंतर हा तिचा पहिलाच विमानप्रवास आहे.

शाहिदच्या व्यग्र शेड्यूलमधून वेळ काढत त्याची ही छोटीशी फॅमिली शहराच्या धकाधकीपासून दूर सुट्टीसाठी जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अभिनेता शाहिद कपूर येत्या काळात लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनात साकारणाऱ्या ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र होणार आहे. ‘पद्मावती’व्यतिरिक्त विशाल भारद्वाज यांच्या ‘रंगून’ या चित्रपटातूनही शाहिद झळकणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता सैफ अली खान आणि बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना रणौत यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. पुढील वर्षी २४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे. पण, तुर्तास तरी शाहिद त्याच्या मुलीलाच जास्त वेळ देत आहे.

shahid-baby-759

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 4:35 pm

Web Title: shahid kapoor and mira rajput head for first vacation with daughter misha see pics
Next Stories
1 १९७५ च्या आणीबाणीवर येणार सिनेमा
2 लग्न न होण्याच्या बाबतीत प्रियांकाने केला खुलासा
3 शाहरुख-अनुष्काच्या ‘त्या’ नजरेने चाहत्यांना दिला धोका!
Just Now!
X