News Flash

‘या’ अभिनेत्याने ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत साइन केली १०० कोटींची डील?

अभिनेते ओटीटी प्लॅटफॉर्म रिलिजसाठी सध्या तगडे मानधन घेते आहेत.

सध्या करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटगृहे बंद आहेत. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी निर्माते आता ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळाले आहेत. सध्या बॉलिवूड कलाकार चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यासाठी तगडे मानधन घेत असल्याचे म्हटले जात आहे. अशातच बॉलिवूडमधील एका अभिनेत्याने आगामी प्रोजेक्टसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत १०० कोटींची डील साइन केल्याचे समोर आले आहे.

पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, शाहिद कपूरने नेटफ्लिक्ससोबत काही प्रोजेक्ट साइन केले आहेत. तसेच त्याने या प्रोजेक्टसाठी नेटफ्लिक्ससोबत १०० कोटींची डील साइन केली आहे. तो केवळ नेटफ्लिक्सवरील सीरिज आणि चित्रपटांमधून डिजिटल विश्वात पदार्पण करणार नसून इतरही काही प्रोजेक्ट्सशी तो जोडला जाणार आहे असे म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

Pick your favourite watch styles by Tommy Hilfiger at great prices on #Myntra. Flaunt yours today! “

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

सध्या अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत असल्याचे पहायला मिळते. अभिनेते अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांची गुलाबो सिताबो, विद्या बालनचा ‘शकुंतला देवी’, आलिया भट्टचा ‘सडक २’, कुणाल खेमूचा ‘लूटकेस’ असे अनेक चित्रपट यापूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. तसेच येत्या काळात अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’, भुज असे अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2020 12:08 pm

Web Title: shahid kapoor signs a rs 100 crore deal with netflix avb 95
Next Stories
1 Emmy Awards 2020 : ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ आणि ‘दिल्ली क्राइम’ला सर्वोत्कृष्ट मालिकेचे नामांकन
2 देव आनंद यांना ‘ही’ अभिनेत्री करत होती नाव बदलून फोन
3 ‘माझ्या पार्टीत ड्रग्ज नव्हते’; करण जोहरचं स्पष्टीकरण
Just Now!
X