News Flash

Photo : ‘ही तर अश्लीलतेची हद्दच’; गौरी खानला फोटोवरून नेटकऱ्यांनी फटकारले

हा फोटो न्युडिटीला प्रमोट करत असल्याचं काही युजर्सने म्हटलं आहे

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. या सुट्टीच्या काळातले अनेक फोटो गौरी सोशल मीडियावर शेअर करत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी गौरीने एक प्राचीन कलाकृती असलेल्या पेंटिंगचा फोटो शेअर केला होता. मात्र हा फोटो अश्लील असल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी गौरीला ट्रोल केलं आहे.

गौरी एक प्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर आहे. त्यामुळे अनेक वेळा घर सजवतांना ती क्रिएटीव्ह काही तरी करायचा प्रयत्न करत असते. यात तिचा भर कलाकृतींकडे जास्त असतो. याचाच प्रत्यय तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसून आला. तिने ट्विटरवर एक पेंटींग शेअर केलं होतं. ही पोस्ट करत तिने ब्लॅक ड्रामा #robertoferri #interiordesign #design #decor”, असं कॅप्शन दिलं होतं. मात्र हा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं.

हा फोटो गौरीच्या घरातील असून पेंटिंगच्या माध्यमातून एक उत्तम कलाकृती रेखाटल्याचं मत तिचं होतं. मात्र नेटकऱ्यांनी हे पटलं नाही. या पेंटिंगच्या माध्यमातून गौरी न्युडिटीला प्रमोट करत असल्याचं काही युजर्सने म्हटलं. तर अनेकांनी तिला हा फोटो अश्लील असल्याचं सांगितलं.

‘वेडी झाली आहेस का? आपल्या घरामध्ये असे फोटो कोणी लावतं का?तुम्ही एक आई आहात. विचार करुन डिझाइन करत जा’, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर ‘मला माहित आहे की तुम्ही पुढारलेल्या आणि नव्या विचारसरणीच्या आहात. मात्र असे फोटो किंवा पेंटिंग घरात लावणं योग्य नाही. यामुळे शाहरुखचं नाव खराब होऊ शकतं. ही तर अश्लीलतेची हद्दच आहे’, असं अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

दरम्यान, नेटकऱ्यांच्या या कमेंट वाचल्यानंतर गौरीने या पेंटिंगचा फोटो ट्विटरवरुन डिलीट केला आहे. मात्र अद्यापही या फोटोची चर्चा चाहत्यांमध्ये सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2019 12:22 pm

Web Title: shahrukh khan wife gauri khan delete her post on twitter after troll ssj 93
Next Stories
1 रोहित शर्माने विराटनंतर अनुष्कालाही केलं अनफॉलो
2 किडनी प्रत्यारोपणावर राणा डग्गुबत्ती म्हणतो..
3 Photo : शाहरुखचा मुलगा ‘या’ मुलीला करतोय डेट?
Just Now!
X