04 August 2020

News Flash

‘थ्री इडियट्स’च्या सिक्वलमध्ये काम करण्यास शर्मन जोशी उत्सुक

थ्री इडियट्स चित्रपट बॉलीवूडसाठी एक टर्निंग पॉईंट ठरला होता

चित्रपटाची कथा लेखनाचे काम पूर्ण होण्याची मी वाट पाहत असून, चित्रीकरणाला केव्हा सुरूवात होईल याबाबत मी खूप उत्सुक आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेल्या थ्री इडियट्स चित्रपटाच्या सिक्वलमध्ये काम करण्यास अभिनेता शर्मन जोशी उत्सुक आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी ‘थ्री इडियट्स’चा सिक्वल तयार करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आल्यानंतर शर्मन जोशीनेही त्यास दुजोरा दिला आहे. शर्मन म्हणाला की, थ्री इडियट्सचा सिक्वल तयार करण्याचा विचारात असल्याचे ते(राजकुमार) म्हणाले होते. चित्रपटाची कथा लेखनाचे काम पूर्ण होण्याची मी वाट पाहत असून, चित्रीकरणाला केव्हा सुरूवात होईल याबाबत मी खूप उत्सुक आहे.
थ्री इडियट्स चित्रपट बॉलीवूडसाठी एक टर्निंग पॉईंट ठरला होता. चित्रपटाने अनेक पुरस्कारांसह बॉक्स ऑफीसवर बक्कळ कमाई केली होती. अभिनेता आमीर खान, आर.माधवन, शर्मन जोशी यांच्यासह अभिनेत्री करीना कपूर, अभिनेते बोमन इराणी आणि ओमी वैद्य यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2016 2:47 pm

Web Title: sharman joshi eagerly waiting to work on 3 idiots sequel
टॅग Entertainment News
Next Stories
1 प्रेम रतन धन पायो आणि शाहरुखला ‘घंटा पुरस्कार’
2 ”वीरप्पन’ सुपरस्टार रजनीकांत यांचे अपहरण करणार होता’
3 ‘जलयुक्त शिवार’ अभियानासाठी अभिनेत्री राजश्री लांडगेचा पुढाकार
Just Now!
X