19 January 2021

News Flash

सुशांत मृत्यू प्रकरण: बॉलिवूड का आहे गप्प? शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितलं कारण…

सुशांत मृत्यू प्रकरणावर बॉलिवूड कलाकार का व्यक्त होत नाही?

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता दोन महिने उलटून गेले आहेत. सीबीआय आणि ईडीमार्फत या प्रकरणाचा तपास सुरु आहे. परंतु सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान अभिनेते शत्रूघ्न सिन्हा यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “सुशांत मृत्यू प्रकरणात नक्कीच काही तरी गडबड झाली आहे, पण सत्य लवकरच समोर येईल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

अवश्य पाहा – अभिनेत्रीने नाकारली ‘बिग बॉस’ १४ ची ऑफर; कारण…

एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत शत्रूघ्न सिन्हा यांनी सुशांत प्रकरणावर भाष्य केलं. इतर बॉलिवूड सेलिब्रिटी या प्रकरणावर का व्यक्त होत नाहीत? याचं कारण त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, “सुशांत एक महत्वाकाक्षी कलाकार होता. जगभरात त्याचे आहेत आहेत. जेव्हा त्याच्या मृत्यूची बातमी ऐकली तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला. सुरुवातीला नैराश्येमुळे कंटाळून त्याने आत्महत्या केली अशी चर्चा होती अन् आता वेगळेच अंदाज बांधले जात आहेत. या प्रकरणात दररोज नवीनच माहिती समोर येत आहे. त्यामुळे उगाचच अर्धवट माहितीच्या आधारे मत व्यक्त करणे योग्य नाही. सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहेत. ते लवकरच सत्य सोधून काढतील. त्यानंतर प्रतिक्रिया देणं योग्य ठरेल म्हणून अनेक कलाकार सध्या शांत आहेत.”

अवश्य पाहा – २० मिनिटांत १ कोटी लोकांनी पाहिला ‘हा’ व्हिडीओ; तुटला YouTube चा जुना विक्रम

सुशांत प्रकरणात आलं नवं वळण

सुशांत मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहे. सीबीआयची १० सदस्यीय टीम मुंबईत दाखल झाली आहे. पोलीस अधीक्षक नुपूर प्रसाद यांच्या नेतृत्त्वाखाली टीम तपास करत आहे. सीबीआय टीमकडून सुशांतच्या स्टाफ कर्मचाऱ्याची चौकशी करण्यात आली आहे. याशिवाय मुंबई पोलिसांकडून सर्व कागदपत्रं घेतली आहेत. यामध्ये सुशांत सिंहचा शवविच्छेदन अहवालाचाही समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 7:45 pm

Web Title: shatrughan sinha sushant singh rajput death case mppg 94
Next Stories
1 म्हणून अभिनेत्री नेहा मेहताने १२ वर्षांनंतर सोडली ‘तारक मेहता…’ मालिका?
2 काही मुस्लीम बॉलिवूडमधील घराणेशाहीला पाठिंबा का देतात; अभिनेत्याने केला सवाल
3 दिलदार प्रेमाची वजनदार गोष्ट : ‘सुंदरा मनामध्ये भरली’
Just Now!
X