21 January 2021

News Flash

‘मैं आई हूँ युपी बिहार लुटने’वर शिल्पा शेट्टीचा भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल

पाहा, शिल्पाचा भन्नाट डान्स

बॉलिवूडची फिट गर्ल अर्थात शिल्पा शेट्टी कायमच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असते. कधी तिच्या वर्कआऊटमुळे तर कधी नृत्यकौशल्यामुळे. आजवर शिल्पाची अनेक बॉलिवूड गाणी आणि त्यातील तिने केलेल्या काही डान्स स्टेप गाजल्या आहेत. शिल्पाचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओत शिल्पाने तुफान डान्स केल्याचं दिसून येत आहे.

‘मैं आई हूँ युपी बिहार लुटने’ हे गाणं सिनेरसिकांसाठी नवीन नाही. आजही हे गाणं लागलं की अनेकांचे पाय थिकायला लागतात. याचा गाण्यावर शिल्पाने ठेका धरला असून नृत्य दिग्दर्शक रेमा डिसुझा, धर्मेश , पुनीत पाठक आणि शक्ती यांनी तिला साथ दिली आहे. इंडियन डान्सर्स कंपनीच्या इन्स्टाग्राम पेजवर शिल्पाचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून त्याला ४७ हजारांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहे. गेल्या १३ वर्षांमध्ये शिल्पाचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे.मात्र, लवकरच ती निकम्मा या चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पुन्हा पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2020 2:03 pm

Web Title: shilpa shetty dance on main aayi hun up bihar lootne ssj 93
Next Stories
1 ‘भाजपा फुकट जाहिरात करुन घेतंय’; अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवर कुणाल कामराचा टोला
2 न्यूड व्हिडीओ प्रकरणी पूनम पांडेला दिलासा
3 प्रथमेश आणि ‘डार्लिंग’? नेमकं काय आहे प्रकरण
Just Now!
X