News Flash

कर्जतचा वडापाव खाण्यासाठी शिल्पा शेट्टीने थांबवली गाडी; पाहा व्हिडीओ

वडापाव खाण्यासाठी रस्त्यावर थांबवली गाडी

अनेक मुंबईकरांसाठी नाश्ता, लंच, डिनर असं सगळं काही म्हणजे वडापाव. कढईतील तेलातून काढलेला खुसखुशीत गरम वडा, त्यासोबत पाव, चटणी आणि मिरची…हे चित्र डोळ्यांसमोर येताच तोंडाला पाणी सुटतं. लॉकडाउनदरम्यान सर्वकाही बंद असताना या वडापावची चव सर्वांना खूपच आठवली असेल. यात मग सेलिब्रिटीसुद्धा अपवाद नाहीत. अभिनेत्री शिल्पा शेट्टीला कर्जतहून मुंबईला परत येताना रस्त्यावर वडापावची गाडी दिसली. मग काय.. गरमागरम वडापाव खायचा मोह तिलासुद्धा आवरला नाही. तिने गाडी थांबवली आणि वडापाववर ताव मारला.

शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती तिच्या गाडीत बसून वडापाव खाण्याचा आनंद लुटताना पाहायला मिळतेय. ‘चलते चलते देखा वडापाव, मन ने बोला संडे है तो खाओ खाओ खाओ.. बनता है भाऊ’, असं गमतीशीर कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty) on

शिल्पाच्या या व्हिडीओला वीस लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून असंख्य नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2020 4:32 pm

Web Title: shilpa shetty shares video of her sunday binge says can not resist vada pav ssv 92
Next Stories
1 “अर्णबला भारतात भीती वाटत असेल तर त्याने पाकिस्तानमध्ये जावे”, अभिनेत्याचे ट्विट चर्चेत
2 ‘कॉमेडी बिमेडी’च्या पहिल्या भागाची खास झलक
3 पूजा हेगडे म्हणते, “दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये स्त्रियांच्या नाभीचं जास्त आकर्षण”
Just Now!
X