News Flash

नवीन वर्षात दीपिकाचा महत्त्वाचा निर्णय; सोशल मीडियावरील पोस्ट केल्या डिलीट?

दीपिकाच्या पोस्ट नेमक्या डिलीट कशा झाल्या?

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते. उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या अभिनेत्रीचे इन्स्टाग्रामवर जवळपास ५ कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्यामुळे या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा दीपिका कायम प्रयत्न करत असते. मात्र, नव्या वर्षात दीपिकाने चाहत्यांना एक धक्का दिला आहे. तिने तिच्या सोशल मीडियावरील सगळ्या पोस्ट डिलीट केल्या आहेत. मात्र, दीपिकाने असा अचानकपणे हा निर्णय का घेतला हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

दीपिकाने केवळ इन्स्टाग्रामच नव्हे तर ट्विटर आणि फेसबुक या सोशल मीडिया अॅपवरुनदेखील तिच्या पोस्ट डिलीट केल्या आहेत. त्यामुळे सध्या तिच्या अकाऊंटवर कोणतीही पोस्ट दिसत नाही. विशेष म्हणजे या पोस्ट दीपिकाने डिलीट केल्या की अन्य कोणत्या तांत्रिक कारणामुळे तिच्या पोस्ट डिलीट झाल्या आहेत. हे मात्र, अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान, दीपिकाच्या सोशल मीडियावरील पोस्ट जरी डिलीट झाल्या असल्या तरी तिचा पती अभिनेता रणवीर सिंग मात्र सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय आहे. नव्या वर्षाच्या स्वागताचे अनेक फोटो त्याने शेअर केले आहेत. त्यामुळे या दोघांचा हा पब्लिसिटी स्टंट तर नाही ना असा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगदोन दिवसांपूर्वी रणथंभोरला गेले आहेत. त्यांच्या सोबत आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि नीतू कपूरदेखील आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2021 11:47 am

Web Title: shocked why deepika deleted her social media post dcp 98
Next Stories
1 मराठी चित्रपटसृष्टीचा दशकभरातला तोटा ४०० कोटींच्या घरात
2 ‘त्या’ घटनेनंतर तब्बल ६ महिने विद्याने आरशात पाहिला नाही चेहरा; कारण वाचून बसेल धक्का
3 स्वाती अन् श्रीधरची जुळणार रेशीमगाठ !
Just Now!
X