25 January 2021

News Flash

ठरलं तर ‘बागी ३’मध्ये हिच अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत

'बागी ३' हा चित्रपट ६ मार्च २०२० ला प्रदर्शित होणार आहे.

Baaghi 3

टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बागी’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद लाभला. त्यानंतर २०१८ मध्ये ‘बागी’चा सीक्वलही आला. यात दिशा पटानी प्रमुख भूमिकेत होती. ‘बागी २’ हा २०१८ मधला सुपरहिट चित्रपट ठरला होता. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच टायगरनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘बागी ३’ ची घोषणाही केली होती. २०२० मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातही टायगर प्रमुख भूमिकेत असला तरी अभिनेत्रीची निवड मात्र झाली नव्हती. आता चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला यांना ‘बागी ३’ साठी योग्य अशी अभिनेत्री सापडली आहे.

या चित्रपटाच्या तिसऱ्या भागासाठी साजिद यांनी श्रद्धाच्याच नवावर शिक्कामोर्तब केला आहे. यापूर्वी सारा अली खान हिचं नाव ‘बागी ३’साठी चर्चेत होतं. ‘केदारनाथ’, ‘सिम्बा’ यांसारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी सारा ‘बागी ३’मध्ये दिसेल अशा चर्चा काल-परवापर्यंत होत्या. मात्र हे सारे तर्क-विर्तक खोडून काढत साजिद यांनी श्रद्धालाच पसंती दर्शवली आहे. ‘बागी ३’ हा चित्रपट ६ मार्च २०२० ला प्रदर्शित होणार आहे. अहमद खान ‘बागी 3’ चं दिग्दर्शन करणार आहेत.

मार्च २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बागी २’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर २५३ कोटींची कमाई केली होती. प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद या चित्रपटाला लाभला त्यामुळे साहजिकच टायगरच्या आगामी ‘बागी 3’कडूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2019 10:10 am

Web Title: shraddha kapoor for will play lead actress in baaghi 3 stars tiger shroff
Next Stories
1 Video : नेटफ्लिक्सचा पहिला ओरिजीनल मराठी चित्रपट- ‘फायरब्रँड’
2 ग्रॅमी पुरस्कारात महिलांची बाजी
3 स्त्री जीवनावर भाष्य करणारा ‘व्हूज नेक्स्ट’? लवकरच प्रदर्शित
Just Now!
X