प्रतिनिधी

मी खूप श्रद्धाळू आहे, फार पूजाअर्चा करते, अशातला भाग नाही. पण मला गणपती अगदी लहानपणापासूनच खूप आवडतो. माझं आजोळ अलिबागचं. तिथे गौरी-गणपती यायचे. मी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत होते. त्यामुळे गणपतीत एकच दिवस सुट्टी असे. पण मी उरलेले सगळे दिवस शाळेला दांडी मारून गावी जात असे. पावित्र्य म्हणजे काय याचा पुरेपूर अनुभव गावच्या गणपतीत घेतला. पूजेसाठी परसातल्या बागेतलीच पानं-फुलं वापरली जात. सजावटीचा भपका नसे. प्लास्टर ऑफ पॅरिस, थर्माकोलविरोधात जनजागृती नंतर सुरू झाली, पण गावी पूर्वीपासूनच हे साहित्य कधी वापरलं जात नव्हतं. तिथला गणेशोत्सव पूर्णपणे पर्यावरणस्नेहीच असे.

prarthana behere tie knot of pooja sawant and siddhesh chavan
प्रार्थना बेहेरेने पतीसह बांधली पूजा-सिद्धेशची लग्नगाठ! लाडक्या मैत्रिणीच्या लग्नात अभिनेत्री झालेली भावुक, म्हणाली…
kolhapur raju shetty marathi news, raju shetty latest news in marathi, raju shetty telescope marathi news, raju shetty durbin marathi news
“दुर्बिणीने शोधूनही माझ्या हाताला डाग सापडणार नाही”, राजू शेट्टी यांचा दावा
sushma andhare
कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांंच्या समोर लढणे आम्हाला मोठे आव्हान वाटतच नाही; उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे मत
sudha murty net worth rs 775 crore but hasnt bought new saree in 30 years read behind story
…म्हणून सुधा मूर्तींनी ३० वर्षांत एकही साडी घेतली नाही विकत; कारण एकदा वाचाच

एरवी वर्षभर न भेटलेले सगळे नातेवाईक गणपतीत गावी भेटायचे. घरात एका वेळी २५-३० माणसांचा राबता असायचा. गणपती अगदी या जिवलगांपैकीच एक आहे, असं वाटायचं. आजही वाटतं. मोदक त्याच्यासाठी केले जातात. पण खातो तर आपणंच. आई गणपतीला तिचा मुलगाच मानायची. आमच्या घरी एक गणपतीची जुनी मूर्ती होती. तिला मी राखी बांधायचे. त्यामुळे तो आपला भाऊच आहे, असं मला वाटायचं. आम्ही एरव्ही घरी गणपती आणत नसू, पण माझ्या बहिणीच्या लग्नानंतर पाच र्वष आईने मुंबईतल्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली. सार्वजनिक गणेशोत्सवात मात्र मी लहानपणी कधीच सहभागी झाले नाही.

माझ्या सासरी पुण्यात पूर्वीपासूनच गणपती आणला जायचा. पण तिथे फक्त दीडच दिवसांचा असायचा. त्यामुळे एवढे कमी दिवस का, असा प्रश्न पडायचा. मूर्तीही अगदी छोटी असायची. लग्नानंतर मी गणपतीची सगळी जबाबदारी स्वतहून घेतली. मुंबईतून मूर्तीसकट सगळं साहित्य घेऊन जाऊ लागले. हळूहळू मूर्तीची उंची वाढत गेली आणि अवघ्या काही इंचांची मूर्ती दीड-दोन फुटांवर पोहोचली. त्यानंतर मात्र आता पुरे, यापेक्षा मोठी मूर्ती नको असं ठरलं.

मागच्या वर्षीपासून आम्ही कांदिवलीतील आमच्या घरीच गणपती आणायला सुरुवात केली. गणपतीची मूर्ती आपण निवडत नाही, ती मूर्तीच आपलं घर निवडते, असं मला नेहमीच वाटत आलं आहे. गेल्या वर्षी आम्ही पांढऱ्या रंगाची आणि मोठ्ठाल्या कानांची मूर्ती आणली होती. सजावट काय करावी, असा प्रश्न होताच. नेमकं तेव्हाच एका फर्निचरच्या प्रदर्शनात वाळलेलं पांढरं झाड मिळालं. मग आम्ही पूर्ण पांढऱ्या रंगातच सजावट केली. त्या वाळलेल्या झाडावर फक्त मिर्ची लाइट्स सोडल्या. खूपच देखणं रूप आलं. रात्री भजन ठेवलं होतं. शूट संपवून मित्रमंडळी दर्शनाला घरी आली होती. त्यामुळे योगायोगाने जागरण झालंच.

या वर्षी दोन-तीन दुकानं, कारखाने फिरल्यानंतर पुन्हा पहिल्याच दुकानात आले, तर दुकानाच्या कोपऱ्यात ठेवलेली एक बालगणेशाची मूर्ती दिसली. मला ती फारच आवडली. लगेच नोंदवून टाकली. यंदाही गेल्या वर्षीप्रमाणेच काहीतरी एकदम वेगळं करण्याची इच्छा आहे. बाप्पाच्या इच्छेप्रमाणे तो करवून घेईलच!

सौजन्य – लोकप्रभा