02 December 2020

News Flash

श्वेता तिवारी आणि अभिनव कोहलीमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर, पतीने शेअर केला मुलाचा व्हिडीओ

अभिनवने श्वेतावर मुलाला त्याच्यापासून दूर केले असून अज्ञात स्थळी नेल्याचा आरोप केला होता..

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री श्वेता तिवारी चर्चेत आहे. या चर्चा तिने पती अभिनव कोहलीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केल्यामुळे सुरु झाल्या होत्या. पण यावर अभिनवने प्रतिक्रिया देणे टाळले होते. दरम्यान अभिनवने श्वेतावर मुलाला त्याच्यापासून दूर केले असून अज्ञात स्थळी नेल्याचा आरोप केला होता. गेल्या ४० दिवसांपासून रेयांशा त्याच्यासोबत रहात होता. पण अचानक श्वेता त्याला घेऊन गेली असे अभिनवने म्हटले होते. आता अभिनवने श्वेताचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहता श्वेता आणि अभिनव यांच्यामधील वाद मिटलेला नाही असे दिसत आहे.

अभिनवने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो मुलगा रेयांशला भेटताना दिसत आहे. काही वेळासाठी श्वेताने रेयांशला भेटू दिले आणि नंतर ती त्याला घेऊन आतमध्ये गेली असे अभिनवने म्हटले आहे. व्हिडीओमध्ये अभिनव रेयांशशी बोलताना दिसत आहे.

व्हिडीओ शेअर करत अभिनवने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘मला मुलाला थोडा वेळ भेटण्यास दिल्यानंतर ती त्याला घेऊन आत निघून गेली आणि त्याच दिवशी मी घराबाहेर बेल वाजत बसलो होतो. हा त्या दिवशी दुपारी केलेला व्हिडीओ आहे. माझा मुलगा रेयांश मला विचारत आहे त्या दिवशी मी दुपारी हॉटेलमध्ये नाही आलो’ असे कॅप्शन अभिनवने दिले आहे.

अभिनवने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. अभिनवने एका पाठोपाठ एक असे तीन चार व्हिडीओ शेअर केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 11:20 am

Web Title: shweta tiwari husband abhinav kohli shares video avb 95
Next Stories
1 Om Shanti Om : सेटवर पहिल्याच दिवशी शाहरुखला मागावी लागली जाहीर माफी, कारण…
2 Laxmii review : प्रेक्षकांची निराशा करणारी ‘लक्ष्मी’
3 ‘IMDb’वर ‘लक्ष्मी’ अपयशी; सर्वांत कमी रेटिंगच्या यादीत समावेश
Just Now!
X