02 March 2021

News Flash

ईशा केसकरच्या घरी सिद्धार्थ-मितालीचं पहिलं केळवण; पाहा फोटो

लग्नाच्या तयारीची खरी तर सुरुवात या केळवणापासून सुरू होते.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर अभिनेत्री मिताली मयेकरशी लवकरच लग्नगाठ बांधणार असून लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. या दोघांची जिवलग मैत्रीण ईशा केसकरने सिद्धार्थ-मितालीचं पहिलं केळवण केलं. ईशा व तिचा बॉयफ्रेंड ऋषी सक्सेना यांनी मिळून सिद्धार्थ-मितालीचं एकत्र केळवण केलं. सिद्धार्थ आणि मितालीने सोशल मीडियावर या केळवणाचे फोटो पोस्ट केले आहेत.

लग्नाआधी वधू-वरांसाठी केलं जाणारं केळवण हे तर सगळ्यांनी एकत्र भेटण्याचं निमित्त असतं. वधू-वरांच्या आवडीचे पदार्थ करून जेवणासाठी पाहुण्यांकडे आमंत्रित केलं जातं. त्यानंतर एखादी भेटवस्तू देऊन लग्नाबाबत शुभेच्छा दिल्या जातात. लग्नाच्या तयारीची खरी तर सुरुवात या केळवणापासून सुरू होते.

पाहा फोटो : दृष्ट न लागो! मराठी कलाकारांच्या देखण्या जोड्या

२०१९ मध्ये सिद्धार्थ-मितालीचा साखरपुडा पार पडला. गेल्या तीन वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. नवीन वर्षात लग्नगाठ बांधत सिद्धार्थ आणि मिताली आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2020 9:37 am

Web Title: siddharth chandekar and mitali mayekar enjoy their first kelvan see pics ssv 92
Next Stories
1 जेव्हा मुलाला भेटण्यासाठी करीनाने तोडलं आईच्या रुमचं कुलूप आणि…
2 कंगना राणावतच्या अडचणीत वाढ
3 साडेनव्याण्णववे संमेलन.. नाटककारांचे!
Just Now!
X