News Flash

सिद्धार्थ चांदेकर घेऊन येतोय ‘सिनेमा कट्टा’

मराठी सिनेसृष्टीतला चॉकलेट बॉय अर्थात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर प्रेक्षकांसाठी एका खास एंटरटेन्मेंट पॅकेज घेऊन येत आहे.

सिद्धार्थ चांदेकर

मराठी सिनेसृष्टीतला चॉकलेट बॉय अर्थात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर प्रेक्षकांसाठी एका खास एंटरटेन्मेंट पॅकेज घेऊन येत आहे. कलाकारांचे चित्रपट, नाटक, मालिका याविषयी जाणून घेण्यात अनेकांना रस असतो पण या व्यतिरिक्त त्यांचं वैयक्तिक आयुष्य आणि इतर काही गोष्टी जाणून घ्यायला मिळावं अशीसुद्ध प्रेक्षकांची इच्छा असते. यासाठीच शेमारु एंटरटेनमेंट लिमिटेड कंपनी खास प्रेक्षकांसाठी ‘सिनेमा कट्टा’ हा अनोखा चॅट शो घेऊन येत आहे.

‘सिनेमा कट्टा’ या चॅट शोचं सूत्रसंचालन सिद्धार्थ करणार आहे. खरं तर सिध्दार्थचा हा पहिलाच चॅट शो आहे आणि या नवीन कामाविषयी तो अतिशय उत्साही आहे. या चॅट शोच्या निमित्ताने समोरच्या व्यक्तीला बोलकं करण्याची सिध्दार्थची प्रतिभा प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि कलाकाराविषयी अधिक माहिती देखील जाणून घ्यायला मिळेल. या चॅट शोमध्ये आतापर्यंत अशोक सराफ, महेश मांजरेकर, महेश कोठारे, अलका कुबल, उषा नाडकर्णी या कलावंतांनी हजेरी लावली आहे. कलावंतांशी सिद्धार्थने दिलखुलास गप्पा मारल्या आहेत आणि या गप्पांमधून त्यांचा फक्त या क्षेत्रातील प्रवासच नव्हे तर त्यांच्याविषयी आजवर फारशा माहीत नसलेल्या गोष्टीही लोकांना कळणार आहेत.

एकूणच मनोरंजन विश्वातल्या घडामोडी, कलाकारांच्या गमतीजमती, धमाल किस्से घेऊन ‘सिनेमा कट्टा’ हा चॅट शो येत आहे. २० ऑक्टोबरपासून दर शनिवारी रात्री ८.३० वाजता टाटा स्काय मराठी सिनेमा, एअरटेल मराठी चित्रपट, डिश आपलं मनोरंजन, व्हिडिओकॉन आपलं मनोरंजन या डीटीएच चॅनेल्सवर पाहता येईल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 1:13 pm

Web Title: siddharth chandekar new chat show cinema katta
Next Stories
1 झाशीची राणी आणि माझ्यात ‘हे’ एकच साम्य – कंगना रणौत
2 ‘माझ्या आयुष्यातलं प्रेम गेलं’ -सलमान खान
3 ‘महिला मंडल’मध्ये अक्षय कुमार; विद्या बालन देणार साथ
Just Now!
X