News Flash

सिद्धार्थच्या प्रेमात पडली ऐश्वर्या!

मराठी सिनेमा हा सध्या यशाची शिखरं चढतोय.

सिद्धार्थ चांदेरकर

मराठी सिनेमा हा सध्या यशाची शिखरं चढतोय. चित्रपटात काम करणारी कलाकार मंडळी अतिशय वेगळ्या प्रसिद्धीच्या झोतात असतात. त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांना एकदा भेटण्यासाठी प्रेक्षक आणि त्या कलाकारांचे चाहते मंडळी काहीही करायला तयार असतात. तेवढंच वेडेपण सध्या छोट्या पडद्यावरील कलाकारांनीही प्रेक्षकांना लावलय . लहान पडदा जरी लहान असला तरीही चांगल्या कार्यक्रमांमुळे आणि लोकांच्या प्रेमामुळे घराघरात पाहिला जातो. हेच प्रेम प्रत्येक मराठी कलाकाराला हवे असते. आणि याच प्रेमाखातरच  हल्ली चित्रपट कलाकार मंडळी लहान पडद्यावर येण्यासाठी इच्छुक असतात.

झी युवा ही नवीन वाहिनी सध्याच्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनतेय. या वाहिनीवरील सुरु असेलेले सध्याचे  कार्यक्रम  बन मस्का , फ्रेशर्स , लव्ह लग्न लोचा, इथेच टाका तंबू , श्रावणबाळ आणि युवागिरी तरुणाईला वेडं लावतायेत. आणि अश्या कार्यक्रमाचा एक भाग व्हायला सध्या प्रत्येक कलाकार आकर्षित होत आहे.

बन मस्का या लोकप्रिय मालिकेत सध्या सिद्धार्थ चांदेरकर या कलाकाराची एंट्री होणार आहे असं म्हंटल जातंय . तसं पाहता सिद्धार्थ सध्या त्याच्या सिनेमामध्ये खूप बिझी आहे. तस पाहता सिद्धार्थने आधीही छोट्या पडदयावर काम  केले आहे.  पण लोकांच्या प्रेमाखातर त्याला पुन्हा एकदा छोट्या पडदयावर यायची इच्छा आहे.  या मालिकेत ऐश्वर्या म्हणजेच मैत्रयीची मैत्रीण,  ही पूर्णपणे सिद्धार्थ चांदेरकर या अभिनेत्याचा प्रेमात आहे असे दाखवले आहे. वाहिनीने क्लुप्ती लढवत मालिकेच्या दिग्दर्शकाने सिद्धार्थलाच अभिनेता सिद्धार्थ चांदेरकर म्हणूनच काम करशील का असे विचारले, आणि सिध्दार्थनेही झी युवा या वाहिनीची आणि बन मस्का या कार्यक्रमाची सध्याची लोकप्रियता लक्षात घेऊन, क्षणाचाही विलंब न करता हा रोल करण्याचे मान्य  केले. आता लवकरच होणाऱ्या सिद्धार्थ चांदेरकर च्या एन्ट्रीने बन मस्का या कार्यक्रमात काय नवीन वळण येते हे पाहायला तुम्हाला नक्कीच आवडेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 4:03 pm

Web Title: siddharth chanderkaras come back on small screen
Next Stories
1 आदित्य बिर्ला ग्रुपच्या चेअरमनच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल
2 ‘सिंगल मदर’ होण्यासाठी काजोल उत्सुक
3 दीपिकाचा हा फोटो पाहून हुरळून जाऊ नका
Just Now!
X