– २४ मार्च रोजी होणार चित्रपट प्रदर्शित!!

आताच्या धकाधकीच्या जीवनात नात्यांचा कसा विसर पडतो याचं चित्रण करणारा ‘माणूस एक माती’ हा चित्रपट २४ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आलं. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव एका वेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे.

शिवम एंटरटेन्मेंट इंडिया लिमिटेडच्या शारदा  विजयकुमार खरात या चित्रपटाच्या निर्मात्या तर डॉ. विजयकुमार खरात सह-निर्माते,  चित्रपटाचं दिग्दर्शन सुरेश झाडे यांचं आहे, कार्यकारी निर्माता देवा पांडे आणि संगीतकार व गीतकार प्रशांत हेडाऊ आणि अमर देसाई अशी या चित्रपटाची टीम आहे.

बदलत्या काळातली नाती, नात्यांकडे पाहण्याचा बदलणारा दृष्टीकोन या आशयसूत्रावर ‘माणूस एक माती’ बेतला आहे. हा एक सकस कौटुंबिक चित्रपट आहे. सिद्धार्थ जाधव आणि गणेश यादव यांच्या  दमदार भूमिका हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य असून, सिद्धार्थ वेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे, त्यांच्या बरोबर स्वप्नील राजशेखर,रूचिता जाधव,हर्षा गुप्ते, वरद चव्हाण हे सहकलाकार आहेत.
‘माणूस एक माती’ या चित्रपटाच्या मार्केटिंग-प्रमोशनसाठी केवळ महिलांचा सहभाग असलेली शिवम सहेली परिवार ही संस्था काम करणार आहे. मराठी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये हा वेगळा प्रयोग ठरणार आहे. ८ मार्चच्या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ही संस्था मार्केटिंग क्षेत्रात पदार्पण करत आहे, असे निर्मात्या शारदा विजयकुमार खरात  यांनी सांगितले.