News Flash

“कियाराबाबत काय विचार करतोस?”; चाहत्याच्या प्रश्नावर सिद्धार्थ म्हणाला…

कियाराबाबत सिद्धार्थने दिले 'हे' थक्क करणारे उत्तर

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून तो कायम चर्चेत असतो. यावेळी सिद्धार्थ कथित प्रेयसी अभिनेत्री कियारा आडवाणीमुळे चर्चेत आहे. चाहत्यांसोबत केलेल्या फॅन्स चॅटमध्ये सिद्धार्थला कियाराबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने देखील गंमतीशीर उत्तर दिले. सिद्धार्थचे ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

हा व्हिडीओ पाहाच – महाभारत, रामायण खरंच घडलं होतं का?

अवश्य वाचा – सोनू सूद मागतोय त्या चीनी लोकांची माहिती; जाणून घ्या काय आहे प्रकरण

कियारा आडवाणी म्हटलं की तुझ्या डोक्यात पहिला शब्द कुठला येतो? चाहत्याच्या या प्रश्नावर सिद्धार्थने ‘शेरशाह’ असं उत्तर दिलं. ‘शेहशाह’ हा सिद्धार्थ मल्होत्राचा आगामी चित्रपट आहे. हा चित्रपट १९९९ साली कारगील युद्धात शहिद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आधारित आहे. सिद्धार्थ या चित्रपटात विक्रम बत्रा यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. तर कियारा विक्रम यांच्या प्रेयसीच्या भूमिकेत झळकणार आहे.

हा चित्रपट येत्या ३ जुलैला प्रदर्शित होणार आहे. परंतु करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे प्रदर्शनाची तारीख आणखी पुढे जाऊ शकते. शिवाय OTT प्लॅटफॉर्मचा मार्ग देखील खुला आहे. अनेक मोठे चित्रपट आता ऑवलाईन प्रदर्शित होउ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘शेरशाह’ देखील OTTवर प्रदर्शित होउ शकतो. ‘शेरशाह’ चित्रपटाच्या चित्रीकरणार दरम्यान कियारा व सिद्धार्थ एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण आफ्रिकेत झाले आहे. परिणामी दोघांनी आफ्रिकेतच नववर्षाचे सेलिब्रेशन केले होते. त्यांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते. यापूर्वी सिद्धार्थ मल्होत्रा अभिनेत्री आलिया भट्टसोबत रिलेशनशिपमध्ये होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2020 11:54 am

Web Title: sidharth malhotras one word for girlfriend kiara advani mppg 94
Next Stories
1 ‘काही हात सापडले, काही निसटले’; वडील मोहन गोखलेंसाठी सखीची भावूक पोस्ट
2 ‘श्रीगणेश’ फेम अभिनेते जगेश मुकाटी काळाच्या पडद्याआड
3 करोना रुग्ण आढळल्यानंतर मलायका अरोराची इमारत सील
Just Now!
X