03 March 2021

News Flash

Simmba Box Office Collection : ‘सिम्बा’ची परदेशातही छप्पर फाड के कमाई !

'सिम्बा' भारतातच नाही तर परदेशातही खूपच गाजतोय.

रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाचा तडका असलेला ‘सिम्बा’ भारतातच नाही तर परदेशातही खूपच गाजतोय. भारताप्रमाणे कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतून या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. परदेशातील जवळपास ९६३ स्क्रिनवर हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आणि पहिल्या दोन दिवसांत ‘सिम्बा’ नं अनपेक्षित कमाई करत सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला. या चित्रपटाचं आंतरराष्ट्रीय कलेक्शन हे जवळपास १३ कोटींच्या घरात आहेत.

अमेरिका आणि कॅनडामध्ये पहिल्याचदिवशी एकूण ३ कोटी ४१ लाखांहून अधिकची कमाई सिम्बानं केली. तर ऑस्ट्रेलिया, फिजी मिळून कमाईचा आकडा हा एक कोटींहून अधिक आहे. युएइमध्ये सहा कोटींहून अधिकची कमाई ‘सिम्बा’नं केली आहे. तर इतर देशांतील कमाईचा हा जवळपास २ कोटी आहे. ही नक्कीच रोहित शेट्टी आणि ‘सिम्बा’च्या टीमसाठी आनंदाची बाब आहे. ऑस्ट्रेलियामध्ये प्रथमच रोहित शेट्टीच्या चित्रपटाला मोठी ओपनिंग मिळाली आहे.

भारतातही या चित्रपटानं पहिल्या दिवशी २० कोटींची कमाई केली आहे.  या चित्रपटात रणवीर सिंगबरोबर सारा अली खान, सिध्दार्थ जाधव, विजय पाटकर, नंदू माधव सोनू सूद, अश्विनी काळसेकर असे अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2018 11:19 am

Web Title: simmba box office collection day 2 in overseas
Next Stories
1 भन्साळींसाठी करण- अर्जुन एकत्र येणार?
2 नाटकांची कॉर्पोरेट नांदी
3 गृहितकांना झिरो करणारे वर्ष..
Just Now!
X