News Flash

श्रेयाने शेअर केली गुड न्यूज, बेबी बंपसोबत फोटो केला शेअर

"तुमचं प्रेम आणि आशिर्वाद कायम राहू द्या."

लॉकडाऊनच्या काळात अनेक सेलिब्रिटींनी चाहत्यांना गोड बातमी देली आहे. यात विरुष्का आणि सैफिनाच्या घरी तर चिमुकल्या पाहुण्यांचं आगमनही झालंय. तर अनेक टेलिव्हिजनवरील अनेक अभिनेत्री देखील या काळात आई झाल्या आहेत.

यातच आता सगळ्यांची फेव्हरेट  श्रेया घोषालने तिच्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केलीय. श्रेयाच्या घरी देखील लवकरच एका छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत श्रेयाने चाहत्यांसोबत एक गुड न्यूज शेअर केलीय. ”बेबी श्रेयादित्य लवकरच येत आहे. शीलादित्या आणि मला ही बातमी तुमच्या सोबत शेअर करताना आनंद होतोय. आम्ही आयुष्यातील नव्या आध्यायाची सुरूवात करत आहोत. तुम्हा सर्वांचे आशिर्वाद आणि प्रेम याची आम्हाला गरज आहे” असं कॅप्शन देते श्रेयाने तिचा बेबी बंपसोबतचा फोटो शेअर केलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by shreyaghoshal (@shreyaghoshal)

2015 मध्ये श्रेया घोषाल प्रियकर शिलादित्यसोबत विवाहबंधनात अडकली होती. पतीचं नाव शिलादित्य असल्याने श्रेयाने कॅप्शनमध्ये येणाऱ्या बाळाचा ‘श्रेयादित्य’ असा उल्लेख केला आहे. श्रेयाच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी तसंचं सेलिब्रिटींनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. गायिका नेहा कक्करने देखील कमेंट करत श्रेयाला शुभेच्छा दिल्या आहेत.

श्रेयाने आजवर तिच्या सुरेल आवाजाच्या जादूने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. सूरेल गळ्यासोबतच श्रेयाला अप्रतिम सौदर्य लाभलंय. त्यामुळे श्रेयाचा मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर देखील ती चांगलीच सक्रिय असते. 2002 सालात आलेल्या देवदास सिनेमातून श्रेयाने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. या सिनेमातील श्रेयाने गायलेलं ‘मोरा पिया’ आणि ‘डोला रे डोला’ ही गाणी तुफान गाजली. पहिल्याच चित्रपटासाठी श्रेयाला प्लेबॅक सिंगर म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर श्रेयाने मागे वळून पाहिलं नाही. जवळपास 14 भाषांमध्ये श्रेयाने आजवर गाणी गायली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 11:23 am

Web Title: singer shreya ghoshal expecting child soon share photo with baby bump kpw 89
Next Stories
1 दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यानंतर पहिल्यांदाच आला करीना-सैफचा फोटो समोर
2 अनुराग-तापसीची पुण्यात रात्री उशिरापर्यंत चौकशी; तीन दिवस चालणार झाडाझडती?
3 अन् अभिषेकने खेचत नेलं ऐश्वर्याला, व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X