प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्या करोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. बालसुब्रमण्यम यांचा मुलगा एस. पी. चरण यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली. मात्र ते अजूनही व्हेंटिलेटरवरच असल्याचं मुलाने सांगितलं. बालसुब्रमण्यम यांना करोनाची लागण झाल्यानंतर जवळपास महिनाभरापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

“त्यांच्या फुफ्फुसांचा त्रास कमी व्हावा आणि लवकरात लवकर त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात यावं अशी आम्ही आशा करतो. मात्र चांगली बातमी ही आहे की त्यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आठवड्याअखेर आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं. बाबा आणि आईंच्या लग्नाचा वाढदिवस होता. बाबा रुग्णालयात आयपॅडवर क्रिकेट आणि टेनिस पाहत आहेत. ते आमच्याशी गप्पासुद्धा मारत आहेत”, असं एस. पी. चरण व्हिडीओत म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by S. P. Charan/Producer/Director (@spbcharan) on

५ ऑगस्ट रोजी एस. पी. बालसुब्रमण्यम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. १४ ऑगस्ट रोजी त्यांची तब्येत आणखी खालावली आणि त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं. तेव्हापासून ते व्हेंटिलेटरवरच आहेत.