News Flash

चुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी

अभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.

रेखा

आपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. पण रेखा यांच्या आयुष्यातील काही गोष्टी नुकत्याच एका पुस्तकामुळे समोर आल्या आहेत. रेखा जेव्हा कलकत्त्यात विनोद मेहरा यांच्याशी लग्न करून सासरी आल्या त्यावेळी त्यांच्या सासूने त्यांना मारण्यासाठी चप्पल हातात घेतली होती. इतकेच नाही तर त्यांना घराबाहेरही हकलवून लावले होते. ही एक अशी घटना आहे ज्यास स्वतः रेखादेखील विसरणे अशक्य आहे. रेखा यांच्या आयुष्यातील अशा अनेक गोष्टी यासिर उस्मान यांच्या ‘रेखाः द अनटोल्ड स्टोरी’ पुस्तकात सांगण्यात आल्या आहेत.
कलकत्ता येथे लग्न केल्यानंतर रेखा आणि विनोद मेहरा हे मुंबईला आले. त्यानंतर ते थेट त्यांच्या घरी पोहचले. त्यावेळी रेखा यांच्या आयुष्याला मोठी कलाटणी आली. मेहरा रेजिडेंस येथे पोहचताच रेखा त्यांच्या सासूच्या म्हणजेच कमला मेहरा यांचा आशिर्वाद घेण्यासाठी गेल्या. त्या पाया पडण्यासाठी वाकताच कमला यांना त्यांना हटकले. तसेच, त्यांना घरात प्रवेश देण्यासही नकार दिला. कमला यांना राग अनावर झाल्याने त्यांनी रेखांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा विनोद यांनी आपल्या आईला समजवण्याचा बराच प्रयत्न केला. पण त्यांनी काहीच ऐकले नाही. उलट त्यांनी पायातली चप्पल काढून रेखा यांना जवळपास मारण्याचाच प्रयत्न केला. आपल्या सासूच्या अशा वागण्याने रेखा अचंबित झाल्या होत्या. आजूबाजूची सर्व मंडळी जमली होती. रेखा यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्या तेथून नंतर निघून गेल्या. पण विनोद मात्र तिथेच आपल्या आईला समजवत राहिले.
या पुस्तकात रेखा यांना बिस्वजीत यांनी केलेले चुंबन, त्यांच्या भांगातील कुंकू याच्यावरही लिहण्यात आलेले आहे. ‘अनजाना सफर’ (१९६९) या चित्रपटावेळी रेखा या चित्रपटसृष्टीत नवख्या होत्या. तेव्हा अभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे हलके चुंबन घेतले होते. त्याचक्षणी ते दृश्य कॅमे-यात कैद करण्यात आले. तेव्हा सेन्सॉरच्या कचाट्यात सापडलेल्या या चित्रपटाने प्रदर्शित होण्यास तब्बल १० वर्षे घेतली. अखेर १९७९ साली हा चित्रपट ‘दो शिकारी’ या शिर्षकाने प्रदर्शित करण्यात आला. पण रेखा आणि बिस्वजीत यांचे चुंबन त्यावेळी चर्चेचा विषय बनले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2016 12:06 pm

Web Title: smooch sindoor and suicide rekha biography gives shocking details on the stars life
Next Stories
1 ‘अ डॉट कॉम मॉम’
2 ‘बाप्पासाठी कोकणातला जुना मोठा वाडा उघडला जातो’
3 ‘लालबागचा राजा, दगडूशेठचा गणपती यांच्याशी तुलना करून काय उपयोग?’
Just Now!
X