News Flash

‘कोणत्याही गोष्टीची गरज लागली तर मला फोन कर’, सोहेल खान आला राखीच्या मदतीला धावून

राखीने सोहेलचा व्हिडीओ शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतची आई जया सावंत या सध्या मुंबईमधील रुग्णालयात कॅन्सरवर उपचार घेत आहे. दरम्यान बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि त्याचा भाऊ सोहेल खान राखीच्या मदतीला धावून आले आहेत. सोहेल खानने राखीला मदत करण्यासाठी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोहेल राखीला ‘कोणत्याही गोष्टीची गरज लागली तर मला फोन कर’ असे बोलताना दिसत आहे.

राखी सावंतने सोहेल खानचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये सोहेल, ‘राखी, तुला किंवा तुझ्या आईला कोणत्याही गोष्टीची गरज लागली तर मला फोन कर. मी तुझ्या आईला कधी भेटलो नाही पण मी त्यांना ओळखतो. तू खूप स्ट्राँग आहेस आणि तू त्यांची मुलगी असल्यामुळे त्या किती स्ट्राँग असतील. त्या लवकरात लवकर बऱ्या होतील. त्या ठिक होताच मी त्यांच्याशी बोलेन’ असे बोलताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

आणखी वाचा : राखीच्या आईच्या मदतीसाठी धावून आला सलमान खान

सोहेलचा हा व्हिडीओ शेअर करत राखीने ‘वर्ल्डमधील माझे सर्वात चांगले भाऊ सोहेल भाई, सलमान भाई’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

राखीची आई संध्या मुंबईमधील हॉस्पिटलमध्ये असून कॅन्सरवर उपचार घेत आहेत. राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आईचे दोन फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करत तिने, ‘माझ्या आईसाठी प्रार्थना करा. ती कॅन्सरवर उपचार घेत आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले होते. हा फोटो पाहून चाहते भावूक झाले होते. एका चाहत्याने राखीच्या खासगी आयुष्यात इतक्या अडचणी असूनही ती प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती असे म्हणत कमेंट केली आहे.

बिग बॉसच्या घरात राखी सावंतने व्यक्तिगत आयुष्यात अनेक संकटाचा सामना करत असल्याचे सांगितले होते. पण घरातील इतर स्पर्धकांनी तिची ही गेम खेळण्याची पद्धत असल्याचे म्हटले होते. पण तसे नव्हते. खऱ्या आयुष्यात राखीची आई कॅन्सरशी लढा देत असल्याचे समोर आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2021 4:59 pm

Web Title: sohail khan lends his support for rakhi sawant watch video avb 95
Next Stories
1 भूमीने सांगितली ‘या’ घराची गोष्ट; सहा वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा
2 ‘रात्रीस खेळ चाले ३’चा प्रोमो प्रदर्शित, सोशल मीडियावर चर्चेत
3 मुंबईतील धक्कादायक घटना! ‘कारभारी लयभारी’मधील अभिनेत्रीला भररस्त्यात मारहाण
Just Now!
X