गीतकार प्रसून जोशी यांनी बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या गाण्याचे लिखाण हे कागदावर नाही तर लोकांच्या ह्रदयावर कोरले जाते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बॉलिवूडमध्ये अधिराज्य गाजवणाऱ्या प्रसून जोशी यांच्या कारकिर्दीचा प्रवास जाहिरात क्षेत्रातून सुरु झाला. जाहिरात क्षेत्रात तब्बल दहा वर्षे काम केल्यानंतर त्यांनी गीतकार म्हणून नवी इनिंग सुरु केली. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी.

१. प्रसून जोशी यांचा जन्म १६ सप्टेंबर १९७१ मध्ये उत्तराखंडमध्ये झाला.

the new york times book review
बुकमार्क : ग्रंथ परिचयाच्या विश्वात..
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी

२. लहानपणापासूनच त्यांना साहित्याची आवड होती. खुद्द त्यांनीच एका मुलाखतीमध्ये यासंबंधी खुलासा केला होता. शाळेच्या दिवसांमध्ये फॅन्सी ड्रेसच्या कार्यक्रमात त्यांनी कवीची भूमिका साकारली. यावेळी त्यांनी जयशंकर प्रसाद यांची भूमिका साकारत त्यांनी लिहिलेली ‘आँसू’ ही कविता सादर केली.

३. प्रसून जोशी यांनी वयाच्या १७ व्या वर्षी ‘मै और वो’ हे पहिले पुस्तक लिहिले.

४. एमबीएचे शिक्षणपूर्ण केल्यानंतर त्यांनी जाहिरात क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला.

५. जाहिरातीच्या त्यांच्या आकर्षित करणाऱ्या लिखाणामध्ये एनडीटीव्हीची ‘सच दिखाते है हम’ आणि कोका कोलाची ‘ठंडा मतलब कोका कोला’ या पंच लाईन त्यांनीच लिहिल्या आहेत.

६. जाहिरातीतील प्रभावी लिखाणामुळे त्यांना जाहिरात गुरु म्हणून ओळखले जाते.

७. दिल्लीतील ‘ओ अॅण्ड एम’ या कंपनीत काम करत असताना प्रसून आणि अपर्णा यांची मैत्री झाली. एकाच क्षेत्रात काम करत असताना अनेक भेटीनंतर प्रसून यांनी अपर्णा यांच्याशी विवाह केला. प्रसूना आणि अपर्णा यांना एक मुलगी असून तिचे नाव ऐशान्या असे आहे.

८. तब्बल दहा वर्षे जाहिरात क्षेत्रात काम केल्यानंतर राजकुमारी संतोषी यांच्या ‘लज्जा’ या चित्रपटातून प्रसून गीत लिहिण्यास सुरुवात केली.

९. ‘फना’, ‘रंग दे बसंती’, ‘तारे जमीन पर’, ‘ब्लॅक’, ‘हम तुम’ आणि ‘दिल्ली ६’ या चित्रपटातील गाणी प्रसून जोशींनी लिहिली आहेत. ‘रंग दे बसंती’ या चित्रपटातील संवाददेखील त्यांनीच लिहिले आहेत. ‘तारे जमीन पर’ या चित्रपटातील गाण्यांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

१०. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील पी. व्ही. सिंधू, साक्षी मलिक आणि दीपा कर्माकर यांच्या कामगिरीबद्दल त्यांनी “शर्म आ रही है ना, उस समाज को जिसने उसके जन्म पर खुल के जश्न नहीं मनाया” ही कविता लिहिली होती. त्यांची ही कविता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले.