बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या ‘दबंग ३’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अलिकडेच त्यांनी दबंगच्या प्रमोशनसाठी स्टार स्पोर्ट्सच्या स्टुडिओमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी सोनाक्षीने विराटची तुलना दबंगमधील चुलबुल पांडेशी म्हणजेच सलमान खानशी केली. त्यावेळचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Video : एकटक पाहणाऱ्या कार्तिक आर्यनमुळे तरुणी वैतागली, अन्..

काय म्हणाली सोनाक्षी?

या व्हिडीओत सोनाक्षी भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहलीची तोंडभरुन स्तुती करत आहे. “विराट कोहली चुलबुल पांडे सारखाच दबंग आहे, आणि सध्या तो गोलंदाजांची जोरदार धुलाई करत आहे.” असे म्हणत तिने विराटचे कौतुक केले. हा व्हिडीओ स्टार स्पोर्ट्सने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

पाकिस्तानी नागरिकांना भारताबद्दलची उत्सुकता; वर्षभरात गुगल केल्या या गोष्टी

‘दबंग – ३’ हा दबंग मालिकेतला अनुक्रमे तिसरा चित्रपट आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या दोनही चित्रपटांनी बॉक्सऑफीसवर कोट्यवधी रुपयांची कमाई केली होती. तसेच या चित्रपटांमध्ये सोनाक्षी सिन्हा हिने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. ‘दबंग – ३’ मध्ये सोनाक्षीच मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. या शिवाय मराठी सुपरस्टार महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर ही देखील या चित्रपटामध्ये अभिनय करताना दिसेल.

दबंग चित्रपट मालिकेत सलमानने चुलबुल पांडे ही व्यक्तिरेखा साकारली आहे. हा चित्रपट फ्लॅशबॅक फॉरमॅटमध्ये तयार केला गेला आहे. यांत पोलीस अधिकारी होण्याच्या आधी चुलबुल कसा होता? हे कथानक दाखवले जाणार आहे. सलमानचा चाहता वर्ग पाहता याआधी प्रदर्शित झालेल्या ‘ट्यूबलाईट’, ‘रेस -३’ व ‘भारत’ या तीनही चित्रपटांनी तिकीट बारीवर काही खास कमाल केली नव्हती. या पार्श्वभूमिवर ‘दबंग -३’ काय कमाल करतो हे नक्कीच पाहण्याजोगे ठरेल असे म्हटले जात आहे.